पाण्यात शिकार शोधण्यासाठी भटकणारी मगर कधी कुणावर हल्ला करेल, याचा नेम नाही. रानावनात संचार करणारे वन्यप्राणी तहानेनं व्याकूळ झाल्यावर पाणी पिण्यासाठी नदी किनाऱ्यावर येत असतात. त्याचवेळी पाण्यात असणारी मगर आपल्या भक्षकाला जबड्यात खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करते. मगरीने माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. वन्य प्राणीही मगरीचा शिकार झाले आहेत. पण काही प्राणी मगरीच्याही नाकी नऊ आणतात. कारण आपल्या पिल्लाला मगरीपासून धोका आहे, असं कळताच एका हत्तीणीने मगरीला पाण्यात तुडव तुडवलं आहे. मगरीने सोंडेवर हल्ला केल्यानंतर हत्तीनीने आक्रमक होऊन जशाच तसं उत्तर दिलं आहे. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
एका नदीकाठी हत्तींचा कळप पाणी पिण्यासाठी येतो. पण पाण्यात असलेल्या मगरीचा त्यांना अंदाजही येत नाही. त्यामुळे शिकारीसाटी टपून बसलेली मगर पाण्यात असलेल्या हत्तीणीवर हल्ला करते. पाण्यात त्या हत्तीणीचा पिल्लाही असतो. त्यामुळे हत्तीण मगरीने हल्ला केल्यानंतर तिच्यावर आक्रमकपणे तुटून करते. जेणेकरुन तिच्या हल्ल्यापासून पिल्लूला वाचवता येईल. हत्तीण आणि मगरीमध्ये झालेली झुंज व्हिडीओत दिसत आहे. भल्या मोठ्या हत्तीवर हल्ला करणं मगरीच्या चांगलंच अंगलट आलं. हत्तीणीने सोंडीने धरून मगरीला पाण्यात तुडवलं. काही काळानंतर मगरीचा मृत्यू झाला असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
लेटेस्ट सायटिंग्स या युट्यूब चॅनलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी हत्तीणीने मगरीसोबत केलेली लढाई कॅमेरात कैद झाली आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मगरीवर हल्ला करून हत्तीणीने शेजारी असलेल्या हत्तींच्या कळपाचीही मगरीच्या तावडीतून सुटका केली. जेणेकरून त्यांना तहान लागल्यावर पाणी पिताना कोणताही धोका निर्माण होणार नाही. या व्हिडीओला कोट्यावधी नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तर शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी हत्तीणीने पिल्लाला वाचवण्यासाठी दाखवलेल्या शोर्याला सलाम ठोकला आहे. तर काहिंनी म्हटलंय, हत्तीच्या नादाला लागल्यावर असंच उत्तर मिळतं.