Crocodile And Python Fight Video : वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. कधी हे व्हिडीओ शिकारीचे असतात, तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे. यात आता मगरीच्या हल्ल्याचा अतिशय भयानक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मगर एका महाकाय अजगरावर जोरदार हल्ला करते. या हल्ल्यात मगर अजगराची अवस्था अशी काही करून ठेवते की पाहून तुम्हाला धडकी भरेल.

व्हिडीओमध्ये मगर आणि अजगर एकमेकांवर वर्चस्व राखण्यासाठी हल्ला करत असल्याचे दिसत आहे. या भांडणात दोघेही एकमेकांवर इतक्या ताकदीने हल्ला करतात की, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल.

मगरीचा महाकाय अजगरावर जोरदार हल्ला

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मगरीने एका महाकाय अजगराला आपल्या जबड्यात पकडून ठेवले आहे, यानंतर ती अजगराला हवेत उचलते आणि गरगर फिरवत दूर फेकते. यावर प्रतिकार म्हणून अजगरही मगरीच्या तोंडाभोवती विळखा घालत तिला मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र मगर तशी संधीच देत नाही. अजगर विळखा घालणार किंवा हल्ला करणार असे दिसताच मगर अजगराला जबड्यात घट्ट पकडून ठेवते आणि जोरजोरात फिरवते, पण तरीही अजगर हार मानत नाही आणि मगरीच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा वारंवार प्रयत्न करतो.

Read More Viral News : चालकांनो कारचे टायर विकत घेताय? मग जरा थांबा! आधी ‘हा’ धक्कादायक Video एकदा पाहाच

मगरीने अजगराला निर्दयीपणे मारले

अनेकवेळा त्याने मगरीला पकडण्याचा प्रयत्नही केला, पण अजगराला यश येत नाही. या हल्ल्यात मगरीने अजगराला एवढ्या निर्दयीपणे मारले की, हे पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. मगर अजगराला फक्त जबड्यात धरूनच ठेवत नाही तर त्याला अतिशय निर्दयीपणे हवेत फिरवत मारून टाकते.

मगर आणि अजगरामधील हल्ल्याचा हा भीतीदायक व्हिडीओ पाहून लोकही घाबरले. दरम्यान, हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, घरामागील अंगणात अजगर आणि मगरीत सुरू आहे लढाई. अनेकांनी हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिलेय की, या लढाईत कोण विजयी झाले? दुसऱ्याने लिहिलेय की, मगरीने त्याला खाल्ले असावे. तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय की, ही लढत खूप धोकादायक दिसते.