मगर हा एक असा प्राणी आहे जो खूप भयंकर आहे. अतिशय शांतपणे शिकारीची वाट बघणे आणि योग्य वेळी सावज हेरून हल्ला करण्याचा गुण मगरीकडे अंगभूत असतो. मगर पाण्यातील धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, जिच्या हल्ल्यातून भलेभले प्राणी वाचत नाहीत. त्यामुळे मगर पाहणं तर दूरचं नाव घेतलं तरी मनात एक भीती निर्माण होते. मगरीने प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण आता सोशल मीडियावर मगरीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहूनचं तुमच्या अंगावर काटा येईल.
कधी कधी जास्त हुशारपणादेखील अंगाशी येतो. तरीही लोक असं काही कृत्य करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. मगरी किती खतरनाक असतात, हे माहित असतानाही तरीही लोक मगरीला हलकेच घेतात आणि त्याच्याशी खेळायला लागतात. सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका व्यक्तीला मगरीशी खेळणे चांगलेच महागात पडले असल्याचे दिसते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्काच बसला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
(हे ही वाचा : छातीवर बसून डोकं जमिनीवर आपटलं अन् दाबला गळा, पोटच्या मुलाला आईनेच केली मारहाण; व्हिडीओही बनवलं, पण सत्य… )
मगरीशी पंगा घेणे पडले महागात
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्टंट करण्यासाठी मगरीच्या जबड्यात डोके ठेवत असल्याचे दिसत आहे. मगरीच्या जबड्यात माणसाने आपले डोके टाकताच ती लगेच आपले तोंड बंद करते आणि आपले दात माणसाच्या डोक्यात घालू लागते. मगरीने आपला जबडा बंद करताच, तो व्यक्ती ओरडू लागतो. हे पाहून त्याचे मित्र त्याला वाचवण्यासाठी त्याच्याकडे धावले आणि जबरदस्तीने मगरीचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला तीव्र वेदना होत असतानाही मगर आपला जबडा उघडत नसल्याचे दिसते आणि त्या व्यक्तीला धरून राहते. हे भयानक दृश्य पाहून लोकही घाबरले.
येथे पाहा व्हिडीओ
या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @NeverteIImeodd नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ लिहिल्यापर्यंत ६.६ दशलक्ष लोकांनी तो पाहिला आहे आणि २७ हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याच वेळी, अनेक लोक व्यक्तीच्या या कृतीला अतिआत्मविश्वास म्हणत आहेत. लोक म्हणतात की, अतिआत्मविश्वासाने काहीही करू नये. बऱ्याच लोकांनी मनुष्याच्या स्थितीबद्दल आणि तो अद्याप जिवंत आहे की नाही याबद्दल प्रश्न विचारल्याचे दिसते.