Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या चतुर मगरीनं एका कासवाला आपली शिकार बनवलं आणि क्षणात फस्त केलं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका विहिरीत मगर दिसतेय. पण तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ही मगर पाण्यावर तरंगत आहे. ती मेल्याचं नाटक करत आहे. हे पाहून कुणीही म्हणेल ही मगर मेली आहे. त्यात विहिरीतल्या कासवालाही असंच वाटलं. आणि तिथेच घात झाला. ही मगर मेल्याचं नाटक करत आहे. मगर मेल्याचं नाटक करते आणि जसं कासव जवळ येतं तसं ती कासवाचं तोंड आपल्या जबड्यात पकडते. बरोबर वेळ साधत मगरीनं कासवावर हल्ला केल्याचं पाहायला मिळतंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हरणावर हल्ला करण्यासाठी मगरीने डाव साधला अन्…; थरकाप उडवणारा VIDEO होतोय Viral

हा व्हिडीओ @tyagivinit7 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आल आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crocodile attack turtles shocking video viral on social media trending news srk