Crocodile Attack: प्राण्यांपासून तुम्ही जितकं अंतर राखाल तितकं चांगलं आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. मगर ही पाण्यातील धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे, जिच्या हल्ल्यातून भलेभले प्राणी वाचत नाहीत. त्यामुळे मगर पाहणं तर दूरचं, नाव घेतलं तरी मनात एक भीती निर्माण होते. मगर ही अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तिच्या आसपाससुद्धा फिरकू नका, असा सल्ला अनेकदा प्राणीतज्ज्ञ देताना दिसतात. मगरीने प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण, आता सोशल मीडियावर मगरीची अशी एक घटना व्हायरल होत आहे, जे थरकाप उडवणारी आहे. काय झालं नेमकं जाणून घेऊया…

नेमकं घडलं तरी काय?

ही घटना दक्षिण आफ्रिकेतील क्वा-झुलु नताल येथील बॅलिटो येथील क्रोकोडाइल क्रीक थीम पार्कमध्ये घडली.  येथील एका प्राणीसंग्रहालयात एका १५ फुटाच्या मगरीने एका व्यक्तीवर हल्ला केला. सरपटणारे प्राणीतज्ज्ञ पार्कमध्ये त्यावेळी प्रात्यक्षिक देत होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, प्राणीसंग्रहालयात काही मगरी आहेत. त्यातील काही तर एकदम लांब आणि बऱ्याच मोठ्या आहेत. या मगरींना हा व्यक्ती हातात काठी घेऊन ढोसलत होता. त्याचवेळी अचानक मगरीने त्याच्यावर जोरदार हल्ला केला.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Snake Bites Man Viral Video
जंगलात तब्बल ७ सापांशी खेळत होता तरुण, इतक्यात एकाने काढला फणा अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…

(हे ही वाचा : तरुणाचा भन्नाट देसी जुगाड! बाईकला बनविली ७ सीटर, मोठ्या कुंटुंबासाठी ठरेल परफेक्ट, Video पाहून तुम्हीही डोक्याला हात धराल )

त्या माणसाची काठी लागताच मगरीने त्या माणसाचा हातच खेचला. मगरीनं आपल्या जबड्यात त्या व्यक्तीचा हात पकडून ठेवला होता. हा हल्ला इतक्या वेगानं झाला की त्याला सावरण्याची संधीदेखील मिळाली नाही. या मगरीनं त्याचा हात आपल्या जबड्यात घट्ट आवळून धरला होता. 

https://fb.watch/qWmJ0Kh3-I/

शेवटी हात कसा काढला बाहेर?

ही मगर मोठी असल्याने तिला आवरणं सोपं नव्हतं. शेवटी त्या माणसाने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली अन् कसाबसा मगरीच्या तावडीतून सुटला. पण, तोपर्यंत त्याच्या हाताला खूप जखमा झाल्या होत्या. त्याला गंभीर दुखापत झाली होती, त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मगरीच्या जबड्यात सापडलेला हा व्यक्ती प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी असल्याची माहिती आहे. घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.