सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे.मगर पाण्यातील धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीच्या हल्ल्यातून भलेभले प्राणीही वाचत नाहीत. त्यामुळे मगरीचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर मगरीचे अनेक व्हिडिओ येत असले तरी हा व्हिडिओ वेगळा आणि धोकादायकही आहे. प्राणीसंग्रहालयातील एक भयावह व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवितोय.
हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. जी महिला दररोज अन्न भरवते तिच्यावर देखील मगरीने हल्ला केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता प्राणीसंग्रहालयात मगरीला पाहण्यासाठी तिथे लहान मुलांसह मोठी लोक आली आहेत. तेवढ्यात प्राणी संग्रहातील केअरटेकर मगरीला अन्न देण्यासाठी आली. तेव्हा महिलेने हात पुढे करताच मगरीने तिच्यावर हल्ला केला. एवढंच नाही तर त्या मगरीने महिलेचा हात जबड्यात घट्ट धरुन ठेवला होता आणि तिला पिंजऱ्यात ओढून घेतलं.
अनेक वेळा प्राणीसंग्रहालयातील तज्ज्ञ असलेले प्राण्यांची काळजी घेणारे केअरटेकरदेखील हे प्राणी हल्ला करतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मगरीने अशा महिले तज्ज्ञावर हल्ला केला आहे.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला मिळत आहे. मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येतात. मात्र तिच्या हातून शिकार सुटते असं क्वचित पहायला मिळतं. हा व्हिडिओ शेअर होताच लोकांनी त्या व्यक्तीलाच दोष देण्यास सुरुवात केली. असे करण्याआधी त्याने विचार करायला हवा होता, असं देखील काही लोकांचं मत आहे.