Viral Video Animals: सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. गोंडस कुत्र्या-मांजरांची पिल्लं ते हुशारीने मोठमोठ्या प्राण्यांना थक्क करणारे इवलेसे प्राणी जीव सगळं काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतं. काही वेळा तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही अशा गोष्टी व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. जसा की आज व्हायरल होणारा व्हिडीओ. तुम्ही बघू शकता की यात एक म्हैस व मगर यांच्यात कडवी झुंज सुरु आहे. शक्तीने समान असणाऱ्या या दोन्ही प्राण्यांमध्ये अक्षरशः जीवन- मरणाची लढाई सुरु आहे. व्हिडिओच्या शेवटाकडे मगर शिकार करण्यात विजयी होणार असे दिसत असतानाच अचानक जे घडलं त्यामुळे नेटकरी चकित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर @top_tier_Wildness या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, व व्हायरल झाल्यापासून या व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स आल्या आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघू शकता की तळ्यात म्हशींचा घोळका छान पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहे. इतक्यात तिथे एक मगर येथे व थेट म्हशीच्या नाकावरच हल्ला करते. अशावेळी म्हैस अचानक झालेल्या हल्ल्याने बिथरून जाते पण हार मानत नाही, ती सुद्धा पलटवार करते.

Video: म्हैस व मगरीची जुंपली, पाण्यात पेटलं युद्ध

हे ही वाचा<< खलिस्थानचे समर्थन करणाऱ्या ‘या’ पंजाबी गायकावर boAt ची कारवाई; कोहलीने केलं अनफॉलो, नेमकी चूक काय?

दरम्यान, या व्हिडीओकडे बघून अनेकांनी म्हशीच्या जगण्याच्या इच्छेचं कौतुक केलं आहे. आपण कोणावरही मात करू शकतो फक्त आपली इच्छाशक्ती अशी दांडगी असायला हवी अशा पद्धतीच्या कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. नाक मुठीत धरून जगण्याचा हा अर्थ माहितच नव्हता अशा मजेशीर कमेंट्स सुद्धा नेटकरी करत आहेत. तुम्हाला या व्हिडिओमधून काय शिकायला मिळालं हे कमेंट करून नक्की कळवा.