Shocking video: जंगलात जिवंत राहणं सोपं काम नाही. कारण कधी कुठून हल्ला होईल सांगता येत नाही. अगदी पाणी पिताना सुद्धा सावध राहावं लागतं. कारण शिकारी पाण्यात सुद्धा दबा धरून बसलेले असतात. याच पार्श्वभूमीवर हत्ती आणि मगरीमध्ये झालेल्या लढाईचा व्हिडीओ समोर आला आहे. तर त्याचं झालं असं की, हत्तींचा कळप नदी किनारी पाणी पित होता. खरं तर सर्वच हत्ती सावधपणे पाणी पीत होते. पण या नदीमध्ये एक मगर दबा धरून बसली होती. दरम्यान संधी मिळताच तिनं एका हत्तीच्या पिल्लावर हल्ला केला. त्या हत्तीची सोंड पकडून मगरीनं त्याला खाली खेचलं. आणि पुढे या लढाईत काय झालं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मादी हत्ती आणि मगर यांच्यातील लढाईचा एक व्हिडिओ आफ्रिकन देश झांबियामधून समोर आला आहे. हत्ती तिच्या पिल्लाला मगरीच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी यात लढताना दिसतो आहे. दोन महाकाय प्राण्यांमधील ही लढाई एका पर्यटकाने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली. चला तर मग जाणून घेऊ या युद्धाचा परिणाम काय झाला आणि कोण कोणावर भारी पडले?

व्हिडीओमध्ये तुम्ही एका मगरीला पाहू शकता, एका मगरीने हत्तीच्या पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून मादी हत्तीने त्या मगरीवर हल्ला चढवला आणि दोघांत जबरदस्त झुंज झाली.हल्ला चढवल्यानंतर, हत्तीने मगरीला पाण्यातच आपटायला सुरुवात केली . या मादी हत्तीने मगरीवर आपल्या सोंडेने सपासप वार केले. दरम्यान, या मगरीने हात्तीच्या तावडीतून सुटण्याचाही बराच प्रयत्न केला. मात्र तीला हत्तीच्या तावडीतून सुटता आले नाही. काही वेळानंतर हत्तीने त्या मगरीला जलाशयाच्या किनाऱ्यावर आणले. तेव्हा मगरीची हालचाल बंद झाली होती. यामुळे एक तर तिचा मृत्यू झाला असावा अथवा तिला गंभीर इजा झाली असावी असा तर्क लावला जात आहे. एका जंगली हत्तीचं वजन हे साधारणपणे ५ ते ६ हजार किलो इतकं असतं. आता इतकं जास्त वजन अंगावर पडल्यानंतर त्या मगरीची काय अवस्था झाली असेल याबद्दल तुम्ही कल्पना करूच शकता. एकूणच या झुंजीत मादी हत्ती वरचढ ठरली.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर anytimemothernature नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “हत्तीच्या नादाला लागायचं कशाला” तर अनेकांनी व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crocodile fight with baby elephant who will win at last animal video viral on social media srk