Viral Video: इंटरनेटवर प्राण्यांचे व्हिडीओ पाहणे हा अनेकांसाठी फावल्या वेळेतील मस्त टाईमपास असतो. अनेक पाळीव प्राण्यांचे सोशल मीडिया अकाउंट तर माणसांपेक्षा सुद्धा जास्त प्रसिद्ध असतात. कुत्रा- मांजरीचे गोंडस खेळकर व्हिडीओ पाहून जितका आनंद होतो तितकेच वन्य प्राण्यांचे व्हिडीओ चित्त थरारक असतात. यावेळेस व्हायरल होणारा व्हिडीओ मात्र नेटकऱ्यांना संभ्रमात टाकत आहे. खरंतर जिला बघूनच जीव थरथरतो अशा मगरीचा हा व्हिडीओ आहे, पण यात मगरीने चक्क एका बेडकासारख्या उड्या मारलेला पाहून नेटकऱ्यांनी अगदी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मगर म्हणताच डोळ्यासमोर काय येतं? काटेरी लांब शरीर, टोकेरी दात, लांब शेपटी, तीक्ष्ण नजर एकूणच काय बघता क्षणी थरकाप उडवेल असे रूप. दुसरीकडे बेडूक म्हणजे टुणटुण उड्या मारणारा इवलासा जीव. या दोघांची वैशिष्ट्य एकत्र केली तर काय होईल हे या व्हायरल व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे. ही मगर नुसती उड्या मारत नाही तर एका माणसाचा पाठलाग करताना दिसत आहे. जर तुम्हाला या प्राण्याची भीती असेल तर हा व्हिडीओ जपूनच पहा. (हे ही वाचा: माणसांना पिंजऱ्यात टाकणारं प्राणी संग्रहालय; वाघ चित्ते सुद्धा झाले चकित, पहा Video)

मगरीचा व्हायरल व्हिडीओ

आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी शेअर केलेल्या क्लिपमध्ये मगर एका माणसाचा पाठलाग करत असलेली दिसून येत आहे. एखाद्या बेडकाप्रमाणे दोन्ही हात व दोन्ही पायांनी उड्या मारताना मगरीला पाहून हा माणूस पुढे पळत आहे.

या व्हायरल व्हिडिओला २८ हजारांपेक्षा पेक्षा जास्त व्ह्यूज आणि हजारो प्रतिक्रिया आहेत. मगरीच्या चपळाईने थक्क झालेल्या लोकांनी कमेंट करत जर आमच्यामागे असा प्राणी धावत आला तर पळण्यापेक्षा घाबरून आम्ही त्याला शरणच जाऊ असे म्हंटले आहे. तुम्ही आजवर मगरीला अशा रूपात कधी पाहिले आहे का कमेंट करून नक्की कळवा.