सोशल मीडियावर मगरीचे नेहमीच शिकार करतानाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मगरींचे काही व्हिडीओ पाहून तर अंगावर शहारे येतात. कूल मूडमध्ये असलेल्या मगरीला तुम्ही कधी पाहिलंय का? होय. पाण्यात उडी घेत कूल एन्ट्री करणाऱ्या महाकाय मगरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गेटरलँड एडव्हेंचर पार्क नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओमध्ये एका महाकाय मगरीने नदीत ज्या स्टाइलने एन्ट्री केलीय, हे पाहून बघणारे फक्त बघतच राहिले. नदीत उडी मारल्यानंतर ही मगरी एखादी शिकार करेल की काय, असा अंदाज येत असताना मात्र ही मगरी अतिशय कूल मूडमध्ये दिसून आली. नदीत ही मगर कूल अंदाजात पोहताना दिसून आली. मगरीच्या खतरनाक शिकारीचे व्हिडीओ खूप जणांनी पाहिले असतील. पण मगरीचा हा कूल अंदाज लोकांना खूपच आवडलाय.

मगरीच्या कूल अंदाजातला हा व्हिडीओ शेअर करून एकच दिवस उलटला आहे. तरीही आतापर्यंत या व्हिडीओला ७१, ८९० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. या व्हिडीओवर लोक वेगवेगळे कमेंट्स देताना दिसून येत आहेत. “अशी कल्पना करा की एखाद्या जंगलात असताना ती तुमच्याकडे बघतेय, ‘मगरीचा कूल व्हिडीओ’, ‘हा व्हिडीओ कुठचा आहे’ अशा वेगवेगळ्या कमेंट्स नेटकरी मंडळी देताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच चांगलाच व्हायरल होतोय.

Story img Loader