Crocodile Killed A Cheetah Video: जंगली प्राण्यांच्या झुंजीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जंगलात त्याच प्राण्यांची चालते, त्यांच्यामध्ये बळ किंवा शक्ती असते. इतर कमी ताकदीचे प्राणी मोठ्या किंवा शक्तीशाली प्राण्यांना बळी पडतात. आपण नेहमी पाहतो, की वाघ, सिंह, बिबट्या किंवा चित्ता यासारखे प्राणी अत्यंत घातक असतात. दूरवरूनही ते शिकार ओळखतात आणि काही क्षणात त्यांचा फडशा पाडतात. त्यांचा वेग इतका असतो, की बहुतेकवेळा शिकार पळून जाण्यात अपयशी ठरतो. हे प्राणी गवत खात असताना त्याच गवतात वाघ, सिंह, चित्त्यासारखे प्राणी दबा धरून बसलेले असतात. अचानक झडप घालतात आणि आपली पेटपूजा करतात. पण कधीकधी आश्चर्यकारक घडते ज्यावर आपला विश्वास बसणार नाही.

चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे. तो ताशी ८० ते १२० प्रती कि.मी. वेगाने पळू शकतो. त्यामुळे समोरील प्राणी कितीही वेगवान असला तरी तो चित्त्याचा सामना करू शकत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल चक्क एका मगरीनं चित्त्याशी पंगा घेतला आहे. मगर ही सर्वात खतरनाक प्राण्यांपैकी एक आहे. एका हल्ल्यात तो समोरच्या प्राण्याचे अक्षरश: दोन तुकडे करते. त्यामुळेच मगरीला किलिंग मशीन असं सुद्धा म्हणतात. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी चित्ता सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

मगरीनं चित्त्यावर एवढा वेगवान हल्ला केला आहे की चित्त्याला काही कळायच्या आतच त्याची शिकार झाली होती. सोशल मीडियावर अनेक वेळा आश्चर्यकारक व्हिडिओ समोर येत आहेत. असे व्हिडिओ लोकांना विचार करायला भाग पाडतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक मगर चित्त्यावर हल्ला करून त्याला ठार मारते. हा हल्ला एवढा वेगवान आहे की चित्त्याला अजिबात समजत नाही आणि चित्ता आपला जीव गमावतो. या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ animalsbnd या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २ लाख ४३ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या चित्त्याबाबत दु:ख व्यक्त केलंय.

Story img Loader