मगर एक शक्तिशाली उभयचर प्राणी आहे. पाण्यात तर मगरीची शक्ती दुप्पटीने वाढते. त्यामुळे पाण्यात मगरीशी वैर नको, अशी म्हण प्रचलित आहे. एकदा का मगरीच्या तावडीत भक्ष्य सापडलं की, वाचणं कठीण असतं. मगरी इतक्या मोठ्या असतात की, शिकार लहान असेल तर ते सरळ गिळतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. एक मगर कासवाला गिळण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक मगर छोट्या कासवाची शिकार करताना दिसत आहे. कावसाची पाठ टणक असल्याने मगरीला कासव गिळता येत नाही. त्यानंतर मगर आपल्या तीक्ष्ण दातांनी कासवाला खाण्याचा प्रयत्न करते. मात्र खूप प्रयत्न केल्यानंतर त्यातही यश येताना दिसत नाही. गिळता येत नसल्याने अखेर मगर त्याला सोडून देते. मगरीच्या तावडीतून सुटल्यानंतर कासवही हळू हळू तिथून दूर निघून जाते. मगरीला असे अयशस्वी झालेले तुम्ही क्वचितच पाहिले असेल.
हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून Scienceturkiyeofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच नेटकरी मजेशीर अंदाज कमेंट्स देखील देत आहे. एका युजर्सने लिहीलं आहे, “मगरीला आता डेन्टिस्टकडे जावं लागेल. दात नक्कीच पडले असतील”. दुसऱ्या युजर्सने लिहीलं आहे, “कोणती टूथपेस्ट वापरते यावर सर्व अवलंबून आहे.’