सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करण्याचं वेड काही माणसांच्या अंगलट येतं. विनाशकाले विपरीत बुद्धी सुचल्यानंतर काय होईल, याचा अंदाजली काही माणसांना बांधणं कठीण असतं. वन्य प्राण्यांसोबत जीवाचा खेळ करणाऱ्या काही जणांना मृत्यूनंही गाठलं आहे. असं असतानाही काही लोक धोकादायक स्टंटबाजी करायला जातात आणि स्वत:ची फजीती करुन घेतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एक तरुण रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या मगरीचा व्हिडीओ काढायला गेला. टॉर्चने मगरीचे डोळे दिपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला मगरीने चांगलीच अद्दल घडवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा सर्व प्रकार दुसऱ्या कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. @alexericsonlee नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत २.५ लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या मगरीचा व्हिडीओ काढणं इतकं सोपं नाही, असं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की म्हणता येईल. कारण मगरीचा व्हिडीओ काढायला गेलेल्या माणसाची पळता भूई झाली, असे दृष्य या व्हिडीओत दिसत आहेत.

नक्की वाचा – आता फुटबॉलची किक नाही, तर…; स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा ‘तो’ Video होतोय Viral

रस्ता आडवल्यानंतर या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्नही त्या मगरीने केला. “मगरीचा व्हिडीओ काढण्याचा वेडेपणा तुमच्या धाडसी वृत्तीत दिसत आहे. एक चांगला व्हिडीओ काढला, पण तुम्ही काळजी घ्या, ही खूप खतरनाक मगर आहे. मला तुमची काळजी वाटते.” असं एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे.