प्राण्यांचे वेगवेगळे रूप दाखवणारे व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ट्रेडमिलवर चालायला शिकणारी मांजर, मालकाची नक्कल करणारा कुत्रा, मांजरीचा ‘स्पा डे’ असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ चेहऱ्यावर हसू आणणारे, ताण विसरायला लावतात. तर याउलट रानटी प्राण्यांचे रौद्र रूप दाखवणारे व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मगर हरणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक हरीण पाणवठ्यामध्ये पाणी पित असल्याचे दिसत आहे, तेव्हाच या हरणावर हल्ला करण्यासाठी पाण्यातून एक मगर पुढे येत असल्याचे दिसते. मगर हरणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते पण तितक्यात हरीण चपळतेने मागे उडी मारते, त्यामुळे हरणाचा जीव वाचतो. पाहा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ :
व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले असून, काही क्षणाच्या अंतराने मृत्युला हुलकावणी देणाऱ्या हरणाच्या चपळतेचे नेटकरी कौतुक करत आहेत.