मगर किती क्रूर प्राणी आहे याचा अंदाज आपल्या सगळ्यांनाच आहे. मगरीच्या तावडीत जो सापडेल तो संपलाच म्हणून समजा. तुम्ही अनेकदा मगरीचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. प्रत्येक वेळी शिकार करताना मगर ही जिकंतेच. सहसा पाण्यात मगरीच वर्चस्व गाजवत असतात, त्यामुळे इतर प्राणी तिच्यापासून लांब पळतात, कधी कधी तर वाघ-सिंहदेखील मगरीपासून लांब पळतात. आतापर्यंत मगरीने केलेल्या शिकारीचे तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील मात्र कधी मगरीने बलाढ्य हत्तीचीच शिकार करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहिलंय का ? कदाचित नाही, पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे भयानक दृश्य पाहायला मिळत आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये –
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका जंगलातील असल्याचं दिसत आहे. यावेळी एका तलावात हत्ती पाणी पिताना दिसतोय दरम्यान याचवेळी अचानक तलावातून मगर डोकं वर काढून हत्तीच्या सोंडेला पकडण्याचा प्रयत्न करते. यावेळी बलाढ्य हत्तीला प्रचंड राग येतो आणि तो मगरीला सोंडेनेच फिरवायला सुरुवात करतो. हत्ती बलशाली असल्यामुळे मगरीचं हत्तीपुढे काही चालत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका मगरीचा आणि हत्तीचा संघर्ष पाहायला मिळाला असून मगरीचा शिकारीचा डाव चांगलाच फसल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ –
इन्स्टाग्राम अकाऊंट @beautiful_post_4u वरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या अकाऊंटवरुन अनेकदा प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केले जातात. दरम्यान या पोस्टला आतापर्यंत 2 हजाराहून अधिक लाईक मिळाले आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.