पाण्यातील सर्वात भीतीदायक प्राणी म्हणजे मगर…पाण्यात असलेल्या मगरीशी टक्कर करणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्याचाच प्रकार आहे. एखाद्या प्राण्याला मगरीने जबड्यात पकडले की त्याची सुटका नाहीच. फक्त पाण्यातच मगरींचे राज्य असते असं नाही. या मगरी पाण्याबाहेरही येऊन आपली दहशत परसवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एक दोन मगरी नव्हे तर शेकडो मगरी समुद्रकिनारी उतरल्या आहेत. या शेकडो मगरी समुद्रकिनारी उतरल्या असून शहरातल्या मानवर वस्त्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.
यूट्यूब पासून रेडिट आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहण्यासाठी फारच भयंकर आहे. साधं मगरीचं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो. मग व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या या शेकडो समुद्राबाहेर मानवी वस्त्यांजवळ आल्या असताना तिथल्या लोकांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. या व्हिडीओमध्ये शेकडो मगरी समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ दुरून शूट करण्यात आला आहे, त्यामुळे तो पाहून सुरूवातीला तुम्हाला जमिनीवर किडे असल्यासारखे वाटेल.
आणखी वाचा : पाण्याखाली ‘मूनवॉक’ करणाऱ्या मुलाचा VIDEO VIRAL, परफॉर्मन्स पाहून थक्क व्हाल
व्हिडीओसह दावा करण्यात आला आहे की, हा ब्राझीलमधील समुद्रकिनारा आहे, ज्यावर शेकडो मगरी आल्या आहेत. सुरूवातीला हा व्हिडीओ r/PublicFreakout नावाच्या अकाउंटवरून Reddit वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर तो इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला.
यामध्ये ब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्यावर मगरींनी हल्ला केला आहे आणि सामान्य लोक खूप घाबरले आहेत. या मगरी एखाद्या गोष्टीबद्दल नाराज आहेत का? नैसर्गिक आपत्ती येणार आहे की या मगरी भूकंपापासून वाचण्यासाठी हे करत आहेत? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. METAL इंटरनॅशनलचे संस्थापक आणि सिंडिकेटेड रेडिओ टॉक शोचे होस्ट केन रुटकोव्स्की यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : भाची हरवल्याची तक्रार करणाऱ्याला इन्स्पेक्टरने चपराक मारली, आता बदली झाली
जेव्हा लोक विचित्र दावे करू लागले तेव्हा अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून आपले मत मांडले. Reddit वर कमेंट करताना एक व्यक्ती म्हणाला, “हे caimans आहेत जे मगरीची एक प्रजाती आहेत. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सर्व मगरी या एकाच प्रजातीच्या आहेत. सामान्य माणसं अजिबात घाबरत नाहीत कारण हे दृश्य बऱ्याचदा पाहायला मिळते. मगरी कशावरही नाराज होत नाहीत, ही त्यांची सामान्य वागणूक आहे. केमन्स (याकेरे कैमन) हे थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी आहेत जे उन्हात उष्णता घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी अशा प्रकारे बाहेर पडतात.”
आणखी वाचा : ‘या’ बोगद्यात ट्रेन लाईटशिवाय जाते, पाहा रोमांचक प्रवासाचा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : पाणी ओसंडून वाहणारा रस्ता ओलांडण्यास मदत करून हा माणूस पैसे कमवतो, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ मात्र प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला प्रत्येकजण शेअर करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला रेडिटवर ६६% टक्के अपवोट्स मिळाले आहेत. तर ८४ कमेंट्स करत लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर ट्विटरवर १०.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ६८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.