Crocodiles Shoe Video Getting Viral On Internet: बदलत्या काळानुसार नवनवीन स्वरुपाचे शूज बाजारात येत असतात ज्यांची किंमत लाखोंमध्ये असते. पण सध्या विचित्र फॅशन ट्रेंडमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी एक तरुणीने नागिन शूज परिधान केले होते आता मार्केटमध्ये चक्क मगरीच्या आकाराचे शूज आले आहेत. मगरीच्या आकारातील शूजचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तुम्हीही हे शूज पाहिल्यानंतर तुम्हीही डोकचं धराल. व्हिडीओ पाहून लोक हे जाणून घेण्यासाठी उत्सूक आहेत की, हे बनवण्याची गरज काय होती.

येथे पाहा व्हिडीओ

हेही वाचा – नोकरी सोडताच तरुणीने घेतला बॉसचा बदला; सहकाऱ्यांच्या इमेलचे पासर्वड….

व्हायरल होत असलेले हे विचित्र शूज पाहून लोकांना हसू आवरणे शक्य होत नाही तर काहीजण अशा विचित्र फॅशनवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. तुम्हीही असे शूज कधीही पाहिले नसतील. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, एक व्यक्ती मगरीच्या आकाराचे शूज परिधान करून चक्क मेट्रोमध्ये प्रवास करत आहे. शूज पाहून लोक थक्क झाले आहेत. असली विचित्र फॅशन कोणाला सुचली कशी असेल असा अनेकांना प्रश्न पडला आहे आणि हा व्यक्ती असा शूज घालून फिरताना पाहून लोकांना धक्काच बसला आहे. जर कोणी अचानक हे शूज पाहिले तर घाबरून आरडो ओरडा करू लागेल.

हेही वाचा – “आयुष्य मनमुराद जगता आलं पाहिजे!” निरासग चिमुकल्यांनी घेतला भिजण्याचा आनंद; घरात केले पाणीच पाणी

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @TheFigen_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, ‘हे काय आहे?’ अवघ्या सात सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २.२ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे, तर पाच हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. युजर्स व्हिडिओवर विविध कमेंट्स करून आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही लोक खूप मज्जा घेत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘डेंजरस शूज.’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘येत्या काळात हे खूप ट्रेंडिंग असणार आहे.’

Story img Loader