आतापर्यंत पैशांच्या अनेक बातम्या वाचल्या ऐकल्या असतील. रस्त्यावरून चालताना आपल्याला दहा रुपये जरी सापडले तरी आनंद गगनात मावेनासे होतो. मात्र ही रक्कम जर कोटींच्या घरात असेल तर विचार करा काय वाटेल. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून अशीच एक घटना समोर आली आहे. सिटी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विनोद मेनन यांना रोख रुपयांचा बॉक्स पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. या बॉक्समध्ये थोडेथोडके नव्हे तर १ कोटी ३६ लाख रुपये होते. गेल्या नऊ महिन्यांपासून हा बॉक्स ऑफिसमध्ये पडून होता. मात्र या बॉक्सकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. साफसफाई करताना हा बॉक्स उघडला तेव्हा त्यात इतकी मोठी रक्कम आढळून आली.

कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याने बॉक्समध्ये रक्कम सोडल्याचं एका चिठ्ठीतून समोर आलं आहे. त्या चिठ्ठीत त्या विद्यार्थ्याने पैसे ठेवण्यामागचं कारणही लिहीलं आहे. कारण वाचून प्राध्यापक विनोद मेनन यांच्या डोळ्यात पाणी आलं. पैशांचा बॉक्स ठेवणाऱ्या व्यक्तीने प्राध्यापक विनोद मेनन यांच्याकडून शिक्षण घेतलं होतं. “या महाविद्यालयातील उत्कृष्ठ शिक्षणामुळे आज जीवनात मोठी उंची गाठली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात इतर मुलेही पुढे शिक्षण घेऊन प्रगती करू शकतात. म्हणूनच हे पैसे देणगी स्वरूपात दिले आहेत.”, असं माजी विद्यार्थ्यांने चिठ्ठीत लिहीलं आहे.

Viral Video: कुत्र्याची मोमोज खाण्यासाठी धडपड; चटणी लावली नाही म्हणून जे काही केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल…

प्राध्यापक विनोद मेनन यांना चिठ्ठी वाचून झाल्यावर अश्रू अनावर झाले. यावर काय प्रतिक्रिया द्यावी, याबाबत सुचलंच नाही. मात्र विद्यार्थ्याच्या कृतज्ञतेबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

Story img Loader