रोजच्या दैनंदिन जीवनात इंटरनेटवर काय व्हायरल होईल, याचा अंदाज लावणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. माणसा माणसांमध्ये झालेल्या संवाद नेहमी ऐकायला मिळतो. पण पाळीव प्राणी, पक्षांमध्येही मधूर वाणी असते, हे एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. प्राणी, पक्षी यांनाही भावना असतात आणि त्या थेट काळजाशी संपर्क करतात. कारण मांजर आणि कावळ्याच्या गोड संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घरातील बाल्कनीत बसलेली मांजर मॅव्ह मॅव्ह करत समोरच्या गॅलरीत बसलेल्या कावळ्याला गोड आवाजात खुणावते. त्यानंतर कावळाही क्षणाचा विलंब न करता मांजरीला काव काव करत जबरदस्त प्रतिसाद देतो. कावळा आणि कबुतरा मध्ये झालेला संवाद तुम्ही अनेकदा पाहिला असेल, पण मांजर आणि कावळाही त्यांच्या स्टाईलने संवाद करु शकतात, हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
बी अॅंड एस नावाच्या युजरने मांजर आणि कावळ्याच्या संवाद ट्विटरवर शेअर केला आहे. ते कोणत्या विषयावर बोलत असतील? असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या दोघांमध्ये असलेल्या गोड संवादाला लाखो नेटकऱ्यांची वाहवा मिळाली आहे. व्हिडीओ नेटकऱ्यांना इतका आवडला की, तब्बल ६ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. मांजर आणि कावळ्याचा हा अप्रतिम व्हिडीओ इंटरनेटवर हजारो लोकांची मनं जिंकत आहे.