Viral Video : २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशासाठी हा खूप खास क्षण होता. ज्या राम मंदिरासाठी १०० हून अधिक वर्ष संघर्ष सुरू होता, तो संघर्ष आता संपुष्टात आला असून राम मंदिराच्या उद्घाटनाने एक नवीन सुरूवात झाली आहे. उद्घाटनानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क कावळा ‘राम राम’ असे म्हणताना दिसत आहे. अयोध्येतील या कावळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण रामाचे भक्तगीते, भजन किर्तन करताना दिसत आहे पण तुम्ही कधी कावळ्याला ‘राम राम’म्हणताना पाहिले आहे का? पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
School teacher dance on marathi song Mi Haay Koli song with student school video goes viral on social media
“मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी..”जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओत तु्म्हाला दिसेल की एक व्यक्ती दिसेल. ती सेल्फीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओमध्ये सांगतात, “अयोध्येतील एक वैशिष्ट्य असे आहे की येथे एक कावळा सुद्धा ‘राम राम’ असे म्हणताना दिसत आहे. पाहा.” त्यानंतर पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही व्यक्ती राम म्हणते त्यानंतर तेथे असलेला कावळा सुद्धा राम म्हणतो. असे एकदा नाही तर पाच-सहा वेळा कावळा या व्यक्तीच्या पाठोपाठ राम म्हणताना दिसतो. पुढे व्हिडीओत ही व्यक्ती म्हणते, “या सोहळ्याचा आनंद फक्त आपल्यालाच नाही तर पशु पक्ष्यांनाही झाला.” या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अयोध्येतील कावळा सुद्धा राम रम म्हणू लागलाय.. व्हिडीओ शेवटपर्यंत बघा”

हेही वाचा : ‘कुमारी आंटी’चा जेवणाचा स्टॉल का आला होता संकटात? बिग बॉसमध्ये आंटी स्पर्धक म्हणून जाण्याची चर्चा

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर जय श्री राम असे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “तो कावळा राम नाही तर काव काव करतोय” तर एका युजरने लिहिलेय, “कावळा हा खूप हूशार पक्षी आहे. वारंवार ऐकलेले शब्द तो लगेच म्हणू शकतो.”

Story img Loader