Crow Viral Video : आजपर्यंत तुम्ही माणसांना चोरी करताना पाहिलं असेल, पण कधी प्राणी, पक्ष्यांना घरात शिरून चोरी करताना पाहिलं आहे का? नसेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा, ज्यात एक कावळा दिवसाढवळ्या लोकांच्या घरातून अशी एक वस्तू चोरी करतोय की पाहून लोकही आश्चर्यचकित झालेत; तर काहींना प्रश्न पडलाय की, हा कावळा ती वस्तू नेमकी कशासाठी चोरी करतोय.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक कावळा चक्क घरात कपडे अडकवण्याचे हँगर चोरताना दिसतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने एक एक करून इतके हँगर जमा केलेत की पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कावळा इमारतीच्या टेरेसवर बसला आहे, यावेळी चोचीत तो कपड्यांचा हँगर पकडताना दिसतोय. काहीवेळाने हँगर चोचीत पकडून तो हवेत भुरकन उडतो आणि एका टॉवरवर जाऊन बसतो. टॉवरवर दिसतेय की, कावळ्याने अनेक घरांमधून हँगर चोरून त्या टॉवरवर गोळा केलेत. यावेळी टॉवरवर एक दोन नाही तर अनेक हँगर अडकवून ठेवल्याचे दिसलेय. हे दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कावळ्याने एवढे हँगर्स एकाच घरातून चोरलेत की कुठून हे स्पष्ट नाही, पण अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरणं अवघड झालं आहे.
हा व्हिडीओ एक्सवर @_Indiana_Bones नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही कधी कावळ्यांना कपड्यांचे हँगर गोळा करताना पाहिले आहे का?’ व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “पहिल्यांदाच पाहिला, पण तो खूप छान आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “छान.”