देशात करोनाची बाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेबाबत सतत शक्यता वर्तवली जात असताना लोकांनी याकडे टुर्लक्ष केले तर पुन्हा रुग्णसंख्या वाढू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशी काही राज्ये आहेत जिथे अद्याप लॉकडाउन वाढविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरीकडे, उकाड्यातून सुटका व्हावी यासाठी हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे पर्यटक येत आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील कोविड -१९ रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या महिन्यात राज्य सरकारने करोना निर्बंधाबाबत शिथिलता घोषणा केल्यापासून पर्यटकांनी कुल्लू-मनाली आणि धर्मशालाकडे उंचीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यटकांच्या या अचानक वाढीमुळे मनालीच्या रस्त्यांवरील गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून अधिकारी व स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड नियमांचे सर्सास उल्लंघन करुन तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले जात आहे असे नेटिझन्सनी मीम्स माध्यमातून म्हटले आहे. ट्विटरवर मनालीचे फोटो व्हायरल होताच #ThirdWave ट्रेण्डिंगमध्ये आहे.

आरटी-पीसीआर अहवाल आणि राज्यात प्रवेश करण्यासाठी ई-कोविड पासची अट मागे घेतल्यामुळे धोक्यात वाढ झाली आहे. नुकताच सोलन जिल्ह्यातील परवानू सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दाखविणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता कारण पोलिसांनी इतर राज्यातून आलेल्या प्रवाशांच्या ई-पासची तपासणी करण्यासाठी वाहने रोखली होती.