बेरोजगारी हा भारतासमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेने उपलब्ध रोजगार अपुरे पडत आहे. शिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही. दिवसेंदिवस बेरोजगार लोकांचा आकडा वाढतोच आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगली नोकरी मिळवण्यासाठी बेरोजगार तरुणांच्या कंपनीबाहेर नोकरीसाठी रांगा लागत आहे. मागच्या माहिन्यात यूपीएस या कंपनीत ५० जागा रिक्त होत्या. यासाठी ४ ते ५ हजार लोक मुलाखतीसाठी आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. एका कंपनीत एका जागेची भरती आहे पण त्यासाठी बेरोजगार तरुणांची गर्दी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका जागेसाठी बेरोजगार तरुणांची लागली रांग

अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात नोकरीसाठी येत आहे. नोकरीसाठी अनेक कंपन्यामध्ये फिरावे लागते. अनेक मुलाखती द्यावा लागतात तरी अनेकांच्या पदरी अपयश येते पण तरीही हार न मानता हे तरुण नव्याने प्रयत्न करत राहतात. व्हायरल व्हिडिओ पुण्यातील एका कंपनीतील आहे जिथे नोकरीसाठी अनेक तरुण जमले आहे, ज्यांच्या हातात रेझ्युमे आहे. व्हिडिओ शुट करणारा तरुण सांगतो की “खराडीतील आयटी पार्कमध्ये Genpact कंपनीत थेट मुलाखतीसाठी उमेवदारावांना बोलवण्यात आले आहे. नोकरीसाठी एकच जागा उपलब्ध आहे पण उमेदवारांची संख्या मात्र तुलनेने जास्त आहे. नोकरी शोधणाऱ्या तरुणांची येथे गर्दी झाली आहे. भारत सरकारने तरुणांना जास्त नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.”

काय म्हणाले नेटकरी

व्हिडिओ इंस्टाग्रामवर vip_patil0511 नावाच्या खात्यावर पोस्ट केला आहे.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, “दोन मशाली ,२ बैल आणि ४ गायी घ्या शेती करा.”

तिसऱ्याने कमेंट केली की,”बिझनेस कर भावा, असल्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही पडणार”