लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. या क्षणी प्रत्येक मुलीला आपल्या आई-वडीलांची साथ हवी असते. काही लोक असेही असतात ज्यांचे आई-वडील या जगात नसतात. अशा लोकांना त्यांच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणी नेहमी काहीतरी कमी असल्यासारखे वाटते. आनंदी असूनही मनात आई-वडीलांची आठवण असते. अशाच एका शहिद सैनिकाच्या मुलीच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. शहीद सैनिकाच्या मुलीला वडीलांची कमतरता भासू नये म्हणून CRPF जवानांनी असे काही केले ज्याची कल्पनाही कधी कोणी केली नसेल. CRPF जवानांच्या या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका हृदयस्पर्शी विवाह सोहळ्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी राजस्थानच्या अलवरमध्ये एका शहीद सैनिकाच्या मुलीच्या लग्नात भावाचे कर्तव्य पार पाडले. लग्नाचे फोटो इंडियन मिलिटरी अपडेट्स या नावाने जाणाऱ्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये वधूचे नाव सारिका मीना असल्याचे सांगितले आहे. सारीका ही दिवंगत सीआरपीएफ कॉन्स्टेबल राकेश कुमार मीना यांची मुलगी आहे. दुबी गावात दिवंगत राकेश कुमार मीना यांच्या घरी हा सोहळा पार पडला.

sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

हेही वाचा –रोज शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षावाल्या काकांना तरुणीने दिली खास भेट! त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद एकदा बघाच! Viral Video

दलाच्या १६८ बटालियनशी संबंधित दिवंगत सीआरपीएफ कॉन्स्टेबल मीना, २०१० मध्ये छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. व्हायरल फोटोमध्ये CRPF जवान त्यांच्या गणवेशात दिसत असून त्यांनी नवरीच्या एन्ट्रीच्या वेळी तिच्या डोक्यावर लाल ओढणी पकडून तिला स्टेजकडे घेऊन जाताना दिसत आहेत.

फोटो शेअर करताना, इंस्टाग्राम हँडलवर लिहिले की, “सीआरपीएफ जवान सारिका मीना, शहीद सीआरपीएफ कॉन्स्टेबल राकेश कुमार मीना यांची मुलगी, राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील दुबी गावात त्यांच्या निवासस्थानी लग्न समारंभात सहभागी झाले होते. सीआरपीएफ कॉन्स्टेबल राकेश कुमार मीना यांनी ८ मे २०१९ रोजी छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी शौर्याने लढताना १६८ बटालियनचे सर्वोच्च बलिदान दिले.

हेही वाचा – काय सांगता! इराणमध्ये पडला चक्क माशांचा पाऊस? आकाशातून खाली पडणाऱ्या माशांचा Video Viral

प्लॅटफॉर्मवर ९००० हून अधिक लाईक्स आणि अनेक प्रतिक्रियांसह हा फोटो व्हायरल झाला. एकाने कमेंट केली आहे की, केली, “प्रोटेक्शन ॲट बेस्ट”. “तुम्ही भारतीय सशस्त्र दल सोडू शकता पण ते तुम्हाला एकटे सोडणार नाहीत,” असे दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

अशीच एक घटना डिसेंबर २०२१ मध्ये घडली होती. त्यानंतर, सीआरपीएफ अधिकारी वधूच्या एन्टीच्या वेळी तिच्या डोक्यावर ओढणी पकडून येताना दिसले होते. एक हक्क भावांसाठी राखीव आहे. ती मंडपाकडे चालत गेली. शहीद सहकारी कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रताप सिंग यांच्या मुलीचे भाऊ जवान बनले आहेत. काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. सिंह हे दलाच्या ११० व्या बटालियनमध्ये तैनात होते.