Viral Video: दिल्लीतील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे; ज्यामध्ये दिल्लीतील सिव्हिल लाइन्स परिसरातील एका मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारमध्ये चक्क एक-दोन नव्हे, तर ३० पेक्षा जास्त शेळ्या आणि मेंढ्या भरल्या होत्या. यासंबंधीची माहिती दिल्ली पोलिंसांना मिळताच त्यांनी शेळ्या आणि मेंढ्यांची सुखरूप सुटका केली.
यादरम्यानचा एक व्हिडीओ X (ट्विटर)वर @Lavely Bakshi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय याबाबत या अकाउंटवरून माहितीदेखील शेअर केली गेली आहे. ज्यात लिहिलंय, “पोलिसांना एक पीसीआर कॉल आला होता; ज्यामध्ये या परिसरातील एका राखाडी रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये मोठ्या संख्येने शेळ्या आणि मेंढ्या ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन, या गाडीचा शोध लावला आणि शेळ्या व मेंढ्यांची सुटका केली.”
हेही वाचा: नाद केला; पण वाया गेला… नव्या गाडीला घरी आणण्याआधीच लावली अशी वाट; VIDEO पाहून युजर्स म्हणाले…
पाहा व्हिडीओ :
इतक्या लहान कारमध्ये शेळ्या-मेंढ्या भरण्यामागचे कारण अजून समोर आलेले नाही. पोलिसांनी कारसह सर्व शेळ्या व मेंढ्यांनाही ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाचा तपासदेखील सुरू केला आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया चर्चेत
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला असून, युजर्स यावर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती विकृत लोक आहेत. यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “जनावरांसोबत लोक इतकं निर्दयीपणे कसे वागू शकतात?”