Violence in West Bengal Viral Video: पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचाराचा कथित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात असल्याचे लाइटहाऊस जर्नालिझमच्या लक्षात आले . तपासादरम्यान आम्हाला आढळले की व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाणीची घटना घडली असली तरी मूळ ठिकाण हे बंगालमधील नाही. व्हिडीओमध्ये एक कुटुंब रडत, हात जोडून हल्लेखोरांसमोर विनंती करताना दिसतंय. एक लहान बाळ सुद्धा या गाडीत आहे. नेमकी ही घटना कधी व कुठे घडली हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X युजर Tulshiram G. Potdukhe ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील हा व्हिडीओ पश्चिम बंगालचा असल्याचा दावा करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला. एका कीफ्रेमद्वारे आम्हाला जागो न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओप्रमाणेच हि क्लिप होती. डिस्क्रिप्शनमध्ये बातमीची लिंक देण्यात आली होती.

https://www.jagonews24.com/m/country/news/921152

लिंकमधील मजकूर (अनुवाद): मैमनसिंगच्या भालुका येथील ग्रीन फॉरेस्ट पार्कमध्ये एका कुटुंबावर पार्कचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर विशेषतः फेसबुकवर व्हायरल झाला आहे. रविवारी (४ फेब्रुवारी) दुपारी उपजिल्हा हबीरबारी युनियनच्या ग्रीन फॉरेस्ट रिक्रिएशन सेंटर (पार्क) येथे ही घटना घडली.

या वृत्तात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या घटनेतील पीडित शाहजहान मिया बादी यांनी रात्री भालुका मॉडेल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून मंगळवारी (६ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी बुधवारी (7 फेब्रुवारी) सकाळी हबीरबारी परिसरातून हल्ल्यात सहभागी असलेल्या ग्रीन फॉरेस्ट पार्कच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली.

यावरून ही घटना बांगलादेशात घडल्याचे स्पष्ट झाले.

आम्ही बांगलादेश मधील फॅक्ट चेकर तन्वीर महाताब अबीर यांच्याशी देखील संपर्क साधला, त्यांनी ही घटना बांगलादेशात घडल्याची पुष्टी केली.

एका अग्रगण्य वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर याविषयीच्या बातमीची लिंकही त्यांनी शेअर केली.

शीर्षकात म्हटले होते: ग्रीन फॉरेस्ट पार्कमध्ये कुटुंबासह फिरत असताना हल्ला

एका वृत्तानुसार, ‘मैमनसिंगच्या भालुका उपजिल्ह्यातील हबीरबारी येथे असलेल्या ग्रीन फॉरेस्ट पार्कला भेट देत असताना शाहजहान मिया आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी उद्यानाच्या गेटसमोर घडली.’ हा अहवाल ७ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकाशित झाला.

हे ही वाचा<< अश्लील हावभाव, माता भगिनींवरुन शिवीगाळ अमरावतीतील Video व्हायरल; बदनामी मात्र यूपीची, खरं काय ते पाहा

या घटनेत तिघांना अटक करण्यात आली होती.

निष्कर्ष: पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचाराचे चित्रण करण्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात बांगलादेशचा आहे जेव्हा या वर्षाच्या सुरुवातीला एका कुटुंबावर हल्ला झाला होता. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.