माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि ते सुद्धा भावूक होऊन रडतात सुद्धा…आपण एक दिवस जरी आजारी पडलो तरी अंथरूण धरून राहतो. कधी कधी वेदना सहन करण्याच्या पलिकडे गेल्या की आपण ढसाढसा रडू लागतो. सोबतच आपल्याला काय त्रास होतोय, हे जवळच्या माणसांना सांगून आपण व्यक्त सुद्धा होतो. पण प्राण्याचं तसं नसतं. त्यांना बोलता येत नसल्याने ते माणसांप्रमाणे भडाभडा बोलून व्यक्त होत नाही. पण वेदना त्यांना होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये घोडाच्या डोळ्यातून लागोपाठ अश्रू वाहताना दिसून येत आहे. रडणाऱ्या या घोड्याचा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल हे नक्की.
सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून रडणाऱ्या या घोड्याच्या व्हिडीओने लोकांची शांतता हिरावून घेतली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना सुद्धा त्यांचे अश्रू अनावर होत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सचे डोळेही पाणावले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक या व्हिडीओवर अनेक कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहे. हा घोडा नक्का का रडतोय, याला कसलं दुःख झालंय असे प्रश्न कमेंट्स सेक्शनमध्ये विचारत या घोड्याच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लॉटरी जिंकल्यानंतर आजीबाईने दुकानदाराला दिले पैसे, एका दिवसात ६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
आतापर्यंत तुम्ही शर्यतीत अगदी वेगाने धावणारे आणि राजेशाही थाटात वावरणारे घोडे तुम्ही पाहिले असतील. पण याच घोड्याला रडताना लोक या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा पाहत आहेत. अगदी माणूस रडतो तसा हा घोडा आपल्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गाळताना पाहून लोक आश्चर्य तर होत आहेत, पण त्याचे पाणावलेले डोळे पाहून लोक दुःखी सुद्धा होत आहेत. या घोड्याला नक्की काय झालंय, म्हणून हा रडतोय, असा सवाल प्रत्येक जण विचारताना दिसून येत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : OMG! मार्केटमध्ये शॉपिंग करताना अचानक साप दिसला आणि…पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा
हा व्हिडीओ थोडा निरखून पाहिलं की लक्षात येतं, हा घोडा एका क्लिनीक किंवा रूग्णालयात उभा असल्याचं दिसून येतंय. या घोड्यावर एखादी ट्रीटमेंट सुरू असल्याचं लक्षात येतंय. कदाचित हा घोडा आजारी असावा आणि त्याच्या उपचारासाठी त्याला रूग्णालयात किंवा क्लिनीकमध्ये आणलं असावं. ट्रीटमेंट दरम्यान त्याला होत असलेल्या वेदना सहन करण्यापलिकडे गेल्या असाव्यात म्हणून हा घोडा रडून आपल्या वेदना व्यक्त करत असावा, असं तर्क नेटकरी मंडळी लावत आहेत. या घोड्याच्या डोळ्यातून अश्रु थांबण्याचं नावच घेत नाहीत. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत हा घोडा रडताना दिसून येतोय.
आणखी वाचा : ‘या’ अमेरिकेन पठ्ठ्यानं ‘रिंकिया के पापा’ भोजपुरी गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : DiCaprio Tree: हॉलिवूडचा सुपरस्टार लिओनार्डो डि कॅप्रिओच्या नावाचं झाड! आफ्रिकामधली एक अद्भुत वनस्पती
हा भावूक व्हिडीओ hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये घोडा इतका रडतोय की ते पाहून कठोर मनाच्या लोकांचं सुद्धा मन पिघळून जाईल. हा व्हिडीओ आतापर्यंत १.५ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून ८४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. काही युजर्सनी तर या व्हिडीओवर अनेक भावूक कमेंट्स शेअर केल्या आहेत. या घोड्यावर लवकरात लवकर उपचार करून त्याला वेदनामुक्त करा, अशी मागणी देखील युजर्स करू लागले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओवर रडणाऱ्या इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.