एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात सीएसकेने विजय मिळवत इतिहास रचला आहे. संपूर्ण क्रिडाविश्वात नंबर वन कर्णधार म्हणून ठसा उमटवलेल्या एम एस धोनीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. पण चेन्नई सुपर किंग्जला समर्थन देणाऱ्या चाहत्यांचा नादच खुळा आहे. देशभरात ज्या ठिकाणी सामना असेल त्या मैदानात धोनी पोहोचण्याच्या आधी पिवळ्या जर्सीतील धोनीचे हे चाहते आधीच पोहोचलेले असतात. कालही धोनी धोनीच्या घोषणा देऊन या चाहत्यांनी आयपीएलचा संपूर्ण हंगामच एकप्रकारे धोनीचा असल्याचं चित्र निर्माण केलं. दरम्यान आयपीएलच्या यंदाच्या हंगामाच्या काळात स्विगीवरून वेगवेगळे फूड प्रेक्षकांनी मागवले होते. यामध्ये सर्वाधिक मागवलेल्या डीशमध्ये बिर्याणीचा क्रमांक आलाय. तसेच मोठ्याप्रमाणात कंडोमही मागवण्यात आले. विशेष म्हणजे स्विगीने याची यादी ट्विटरवर शेअर केली आहे.
आयपीएलदरम्यान स्विगी इंस्टामार्टद्वारे २,४२३ कंडोमची विक्री, कंपनीने केले मजेदार ट्विट
IPL 2023: सर्वत्र यंदाच्या आयपीएलची फायनल मॅच सुरु आहे, अशात स्विगीने त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे झालेल्या कंडोमच्या विक्रीबद्दल माहिती दिली आहे.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-05-2023 at 16:03 IST
TOPICSआयपीएल २०२५IPL 2025ट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk gt ipl final 2423 condoms sold via swiggy insta mart on ipl final evening durex india swiggy share list on twitter srk