RCB vs CSK Match Highlights: बॉलीवूड स्टार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी, अनुष्का शर्मा सोमवारी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध आरसीबीच्या मॅचला पोहोचली होती. मॅच बंगळुरूच्या घरच्या मैदानात असूनही चेन्नई कडून खेळणाऱ्या धोनीची हवा स्टेडियमध्ये दिसून आली. एवढं की, अनुष्का सुद्धा एका क्षणाला प्रेक्षकांचं धोनीवरचं प्रेम पाहून भारावून गेली होती. धोनीने सामन्यात फक्त एका चेंडूचा सामना केला पण एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताच्या माजी कर्णधारासाठी दणदणीत चिअर्स सुरु होते. यावेळी अनुष्काच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा RCB च्या अधिकाऱ्यांसह स्टेडियममध्ये बसलेली दिसली. एमएस धोनी फलंदाजीला आला तेव्हा प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे ती सुद्धा भारावून गेली होती. धोनी त्याच्या गार्डला खूण करत असताना कॅमेरा अनुष्कावर पॅन झाला जिथे ती “हे प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करतात, काय करणार” असे म्हणताना दिसली.

हा व्हिडीओ फक्त काही सेकंदांचा होता पण IPL च्या तीक्ष्ण कॅमेरामॅनच्या नजरेतून हा क्षण सुटू शकला नाही. सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल केला आहे. काहींनी हाच धोनीच्या खेळाचा प्रभाव आहे असे म्हणत कमेंट केली आहे तर काहींनी वहिनी विराट पण कमाल आहे, विराटवर पण आमचं प्रेम आहे असे कॅप्शन देत हे व्हिडीओ शेअर केले आहेत.

Video: धोनीवरचं प्रेम पाहून अनुष्काची प्रतिक्रिया होतेय व्हायरल

हे ही वाचा<< अर्जुन तेंडुलकरच्या IPL पदार्पणावर सचिनची ‘बाप’ प्रतिक्रिया वाचून डोळे पाणावतील! म्हणाला, “जर तू खेळाला आदर…”

दरम्यान, चेन्नईने ठेवलेल्या २२७ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी आरसीबीचा डोलारा सांभाळला. मॅक्सवेल आणि कर्णधार डू प्लेसिस या जोडीने अवघ्या ४८ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली.

तर सलामीवीर विराट कोहली लवकर बाद झाला. चेन्नई सुपर किंग्जला पहिल्याच षटकात पहिला यश मिळाले. विराट कोहलीला आकाश सिंगने क्लीन बोल्ड केले. कोहलीला आकाशचा चौथा चेंडू नीट खेळता आला नाही. चेंडू त्याच्या पायाला लागून विकेटवर आदळला. त्यावेळी अनुष्का मात्र पूर्ण नाराज झालेली दिसून आली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk vs rcb anushka sharma comments on dhoni from stadium kohli fans reacts ipl 2023 match point table highlights svs