आयपीएल सामने पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक स्टेडियमवरील कॅमेऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अतरंगी गोष्टी करीत असतात. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी फॅन्स करत असतात. तर कधी मोठमोठ्यानं आरडा-ओरडा करुन क्रिकेटर्सना चिडवतात. कधी पोस्टरवर असा मॅसेज लिहतात की कॅमेराचं लक्ष वेधून घेतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोनं फक्त स्टेडियमवरच्या कॅमेराचेच नाही तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचंही लक्ष वेधलं आहे.
चाहत्याची विराट कोहलीकडे अजब मागणी
बंगळुरूमधील चिन्नस्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीवर ८ धावांनी विजय मिळवला. यासह चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या आयपीएलमधील सलग तिसरा सामना जिंकला. परंतु या सामन्यादरम्यान एका लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगा हातात पोस्टर घेऊन उभा असून यावर त्याने विराटसाठी खास मेसेज लिहिला आहे. चिमुकल्यानं हातात घेतलेल्या पोस्टरवर ‘हाय विराट अंकल मी वामीकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?’ असे लिहिले आहे. वामीका ही विराट कोहलीची २ वर्षाची मुलगी असून तिला डेटवर घेऊन जाण्याची मागणी या लहान मुलाने केली आहे.
पाहा पोस्ट –
हेही वाचा – बिकिनीमध्ये फोटोशूट करण्यासाठी ती उभी होती, फोटोग्राफरने केलं असं काही की…Video पाहून होईल हसू अनावर
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोवर विराट किंवा अनुष्का शर्माकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी देखील काही नेटकऱ्यांकडून याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेकांनी या प्रकाराचा निषेध केला असून चिमुकल्याच्या आई वडिलांना दोषी ठरवलं आहे.