आठवड्याभरापूर्वी दिवाळखोरीत निघालेल्या आर्मेनियाच्या एका कंपनीने आपल्या कर्मचा-यांना पगाराच्या बदल्यात चीज दिले होते. इतकेच नाही तर बँकेचे कोट्यवधीचे कर्ज देखील चीज देऊन फेडावे अशी वेळ या कंपनीवर आली होती. पण ही झाली कंपनीची गोष्ट. आता अशीच वेळ क्युबा या देशावर आली आहे. चेक प्रजासक्ताचे कर्ज फेडण्याइतके या देशाकडे पैसे नाहीत त्यामुळे हे कर्ज रमच्या रुपाने फेडण्याचा प्रस्ताव या देशाने चेक प्रजासत्ताक पुढे ठेवला आहे.

वाचा : टेक ऑफपूर्वी विमानतळावरच दिली बक-याची कुर्बानी

क्युबाने चेककडून १८७ कोटींचे कर्ज काढले होते. पण हे कर्ज फेडण्याएवढे पैसे क्युबाकडे नाहीत. त्यामुळे आता क्युबाने याबदल्यात चेक पुढे अजब प्रस्ताव ठेवला आहे. पैसे नसल्याने आपण या देशाला तितक्याच किंमती रम देऊ असे या प्रस्तावात म्हटले आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार चेक या प्रस्तावावर विचार करत आहे. जर क्युबाने चेकला १८७ कोटींचे मद्य दिले तर येणारी १०० वर्षे तरी या देशाला मद्याची कोणतीही कमतरता भासणार नाही.

VIRAL VIDEO : पैशांसाठी नाही तर खरेदीसाठी लावली भलीमोठी रांग

क्युबन सिगार नंतर क्युबाची रम हा मद्यप्रकार जगभर प्रसिद्ध आहे. क्युबातून मोठ्या प्रमाणात रमची निर्यात होते. जगातील सर्वाधिक मद्यपान करणा-या देशाच्या यादीत चेक अघाडीवर आहे. गेल्याचवर्षी चेकने मोठ्या प्रमाणत रम क्युबामधून आयात केली होती. चेक काही अंशी क्युबाचा हा प्रस्ताव मानायला तयार ही झाला असल्याचे समजते आहे. पण क्युबाने किमान कर्जाची अर्धी रक्कम तरी पैशांच्या रुपात फेडावी आणि अर्धी रक्कम रम द्यावी अशी अट क्युबाला घालण्यात आली आहे.

Story img Loader