जगभरात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडत असेल, असा प्रश्न कधीतरी तुमच्या मनात आला असेलच. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ मेघालयातील मौसिनराममधला आहे, जे जगातील सर्वात पावसाचे ठिकाण मानले जाते. मौसिनराम या ठिकाणाने आता नवा विक्रम केलाय. ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे.

गुरुवारी, १६ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सुरू झालेला या ठिकाणचा मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सुरू होता. हा पाऊस इतका जबरदस्त होता की अवघ्या २४ तासात १००३.६ मिमी पाऊस पडला. याआधी  चेरापुंजीत  १६ जून १९९५ रोजी एकाच दिवसात १५६३.३ मिली इतका जोरदार पाऊस झाला होता.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर

आणखी वाचा : खोडकर मुलाने हातात घेतली पाल, त्यानंतर घरच्यांसोबत केलं असं काही की…; पाहा हा VIRAL VIDEO 

७ जून १९६६ रोजी मौसिनरामला एका दिवसात ९४५.५ मिलिलिटर पाऊस पडला, जो त्यापूर्वीचा एक दिवसाचा सर्वाधिक पाऊस होता. हे ठिकाण चेरापुंजीच्या शेजारी आहे. जिथं एवढा पाऊस पडतो, तिथं माणसं कशी राहात असतील, असा विचार हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंंतर येतो.

जगातील सर्वाधिक आर्द्रता असलेले ठिकाण म्हणून मेघालयच्या मौसिनरामचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. बंगालच्या उपसागरामुळे येथे भरपूर आर्द्रता आहे. तसंच येथे सरासरी वार्षिक पाऊस ११,८७१ मिमी आहे. मात्र १६ जून रोजीच १० टक्के पाऊस झाला.

येथे वर्षभर पावसाचे प्रमाण इतके असते की रिओ डी जनेरियो येथे असलेल्या ३० मीटर उंच स्टॅच्यू ऑफ क्राइस्टच्या गुडघ्यापर्यंत पाणी येते. चेरापुंजीची जागा आता मौसिनरामने घेतली आहे, ते १५ किमी अंतरावर आहे. १९८५ साली मौसिनराम येथे २६०० मिमी पाऊस पडल्याची गिनीज बुकमध्ये नोंद आहे, जो स्वतःच एक विक्रम होता.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : “ताई, माझ्या गाडीचा धक्का सुद्धा लागला नाही…!” स्कुटीवरून स्वतःच पडली अन् मागच्या बाईकस्वारावर चिडली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या शिक्षिकेचा ‘झुमका बरेली वाला’वर डान्स, बड्या बड्या हिरोईन्सही पडतील फिक्या

या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे जीवन तेथील हवामानावर अवलंबून असतं. मौसिनराम आणि चेरापुंजीमध्ये हवामान नेहमी दमट असते. लोकांचे कपडे, अन्न आणि काम वाळवंटात राहणाऱ्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. या भागात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे इथे शेती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे इथे सर्व काही इतर गावांतून, शहरांतून येतं. हा माल प्लास्टिकमध्ये गुंडाळून ड्रायरने वाळवून विकला जातो.

येथे लोक नेहमी बांबूच्या छत्र्या सोबत ठेवतात. त्यांना कानूप म्हणतात. लोक कामावर जाण्यासाठी प्लास्टिक घालतात. पावसामुळे रस्ते लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्यात लोकांचा बराच वेळ जातो. जीवन खूप कठीण आहे आणि पावसामुळे ते अधिक कठीण होते.

येथे बांधलेले पूलही नेहमीच जीर्ण अवस्थेत राहतात. हे पाहता दरवर्षी स्थानिक लोक झाडाच्या मुळांना बांधून बांबूचा पूल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम करतात. रबर किंवा बांबूचे पूल बहुतेक मजबुतीमुळे बनवले जातात. ते पाण्यात लवकर खराब होत नाहीत किंवा भाराखाली तुटत नाहीत. नीट बांधल्यास बांबूचा पूल जवळपास एक दशक टिकतो. म्हणजे एकंदरीत तुलना केली, की मुंबई किंवा बंगळुरूसारखी शहरे पावसाने त्रस्त होतात, तेव्हा ही शहरे सुद्धा अडचणीत येत असावीत.

आणखी वाचा : त्सुनामी सारखे ढग तुम्ही कधी पाहिलेत का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

मौसिनराम हे नैसर्गिक सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. पावसात उंचावरून कोसळणारा पाण्याचा झरा आणि धुक्यासारखे दाट ढग जवळून पाहणे म्हणजे आनंदच असतो. मौसिनराम जवळ मावजिम्बुइनच्या नैसर्गिक गुहा आहेत, त्या त्यांच्या स्टॅलेग्माइट्ससाठी प्रसिद्ध आहेत. स्टॅलेग्माइट्स म्हणजे गुहेच्या छतावरून टपकून जमिनीवर जमा झालेला चुना.

का होतो इतका मुसळधार पाऊस?

‘बंगालचा उपसागर’ मान्सून ही दक्षिण हिंदी महासागरातील कायम वाऱ्यांची शाखा आहे, जी विषुववृत्त ओलांडून पूर्वेकडे भारतात प्रवेश करते. हा मान्सून प्रथम म्यानमारच्या अरकान योमा आणि पिगुयोमा पर्वतरांगांना धडकतो, त्यामुळे ईशान्येत मुसळधार पाऊस पडतो. मग हे मान्सूनचे वारे थेट उत्तरेकडे वळतात आणि गंगेच्या डेल्टा प्रदेशातून खासी टेकड्यांवर पोहोचतात. सुमारे १५,००० मीटर उंचीपर्यंत मेघालयातील चेरापुंजी आणि मौसिनराम या ठिकाणी जोरदार पाऊस पडतो.