असं म्हणतात की आपली आई ही आपली पहिली गुरू असते. कारण आई तिचं बाळ गर्भात वाढत असताना त्याच्यावर चांगले संस्कार करत असते. शाळेत जाण्याआधीच आईच आपल्याला बोलायला, चालायला शिकवते. जेवण भरवत असताना हा घास चिऊचा म्हणत प्राणी पक्ष्यांची ओळख करून देते. त्यामुळे आई ही आपल्या मुलांना सगळ्याच गोष्टीचं ट्रेनिंग देत असते. अशाच एका आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आई आपल्या पाच वर्षाच्या लेकराला गोळीबारापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं याचे धडे देताना दिसतेय. हा व्हिडीओ साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतोय.

दहशतवाद आता आपल्या अगदी दारात येऊन ठेपला आहे. हा धोका आटोक्यात राहण्यासाठी एक नागरिक म्हणून आपण काय करायला हवे? कोणती दक्षता, काळजी घ्यायला हवी? सरकार तसेच पोलिस यंत्रणांना कसे सहकार्य द्यायला हवे? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर विचार करण्याची वेळ आहे. ही गरज ओळखून एका अमेरिकी महिला तिच्या पाच वर्षाला मुलाला गोळीबारामध्ये स्वतःचं संरक्षण कसं करायचं याचं ट्रेनिंग देत आहे. जर गोळीबार झाला तर काय करशील असं विचारत ही आई तिच्या मुलाकडून प्रात्यक्षिकं करून घेताना या व्हिडीओमध्ये दिसतेय.

आणखी वाचा : सत्तेची ‘नशा’! किरकोळ गोष्टीवरून मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरला मारली चपराक, CM नी मागितली माफी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एखाद्या शूटरने त्याच्या शाळेत घुसखोरी केली तर तो स्वतःची बुलेटप्रूफ स्पायडर-मॅन बॅग कशी वापरेल हे मुलाने दाखवले आहे. एखादा शूटर त्याच्या वर्गात असेल तर त्याने “पूर्णपणे शांत राहावे” आणि पोलिसांनी कोणी आत आहे का असे विचारले तर त्याला प्रतिसाद देऊ नये, असं आई आपल्या मुलाला शिकवताना दिसतेय. अमेरिकेतल्या ओक्लाहोमा येथील २२ वर्षीय कॅसी वॉल्टन हिने आपल्या मुलाला हे ट्रेनिंग दिलंय.

आणखी वाचा : VIRAL : सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करणारी ‘ती’ वकील महिला नक्की कोण? ३ महिन्यांपूर्वीच भाड्याने घर घेतलं होतं…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मित्राने केली नको ती मस्करी! नवरदेव खवळला अन् लग्नमंडपातच सुरू झाली मारामारी

अमेरिकेला गोळीबाराच्या घटनांचा मोठा इतिहास आहे. NPR नुसार, एकट्या २०२२ या वर्षात शाळांमध्ये २७ गोळीबार झाले होते. त्यापैकी सर्वात प्राणघातक घटना मे महिन्यात टेक्सासमधील उवाल्डे येथे घडली, जिथे एका किशोरवयीन मुलाने १९ मुले आणि दोन शिक्षकांची हत्या केली. म्हणून अशा घटनांमध्ये आपल्या मुलांना स्वसंरक्षण करता आलं पाहिजे, ही गरज ओळखून कॅसी वॉल्टन हिने आपल्या पाच वर्षाला मुलाला हे ट्रेनिंग दिलंय. याबद्दल तिचं सर्वच स्तरातून कौतूक केलं जातंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ही बटालियन आहे की संपूर्ण सेना? शेकडो बदक रस्त्यावर सैन्यासारखे कूच करू लागले, ट्रॅफिकच थांबवली!

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागलाय. ‘मॉम व्हिल फाइंड यू’ हा व्हिडीओ शेअर करून लोक आपल्याही मुलांना असं ट्रेनिंग देणं गरजेचं असल्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत.

Story img Loader