Customer And Restaurant Worker Fight Video : कुठेही कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराला पैसे दिलेच पाहिजेत हे उघड आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्येही तसेच आहे. काही खाल्ले, तर पैसे मोजावेच लागतात. पण, काही लोक असे असतात की, ज्यांना कुठेही गेले तरी फुकट खायचे असते आणि पैसे मागितल्यावर ते गोंधळ घालण्यास सुरुवात करतात. दादागिरी करून ते पैसे देण्यास नकार देतात. असाच काहीसा प्रकार एका रेस्टॉरंटमध्ये घडला आहे. या रेस्टॉरंटमध्ये काही लोकांनी बिर्याणीवर ताव मारला; पण बिल भरण्याची वेळ आली तेव्हा ते गोंधळ करू लागले. यावेळी रेस्टॉरंटमालक आणि ग्राहकांमध्ये हाणामारी सुरू झाली; ज्यात रेस्टॉरंटची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
ही घटना पाकिस्तानमधील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही ग्राहक मिळून रेस्टॉरंटची तोडफोड करताना आणि रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी ग्राहक रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना बाहेरील टेबल, खुर्च्या फेकून मारत होते. या हाणामारीमुळे रेस्टॉरंट जणू काही कुस्तीचा आखाडा बनला होता. ग्राहक आणि रेस्टॉरंट कर्मचारी मिळेल ते उचलून एकमेकांवर फेकून मारत होते. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीची सुरुवात बिल भरण्यावरून झाल्याचा दावा केला जात आहे. रेस्टॉरंटमालकाने त्यांना बिल भरण्यास सांगितले; पण हे ग्राहक फुकट जेवण करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी ग्राहक आणि रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांची मारामारी पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती, मात्र कोणीही त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली नाही. यामुळे काही मिनिटे हे तुफान भांडण सुरुच होते. यामुळे घटनेत अनेकजण जखमी झाले असल्याचीही शक्यता आहे.
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
हाणामारीचा हा तणाव दाखविणारा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; जो हजारो लोकांनी लाइकही केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी लाईक करत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने गमतीशीरपणे लिहिलेय, “पाकिस्तानी लोकांकडे पैसे नाहीत, तर ते कसे देणार?” तर, दुसऱ्या युजरने लिहिलेय, “वाह पाकिस्तान, खूप लढा आणि नष्ट व्हा.” त्याचप्रमाणे आणखी एका युजरने लिहिलेय, “बिर्याणीच्या बिलापेक्षा तोडफोडीचे बिल जास्त असेल.” तर, काही युजर्स असे म्हणत आहेत, “पाकिस्तानची ही हाणामारी पाहिल्यानंतर त्यांना बागपत चाट युद्धाची आठवण आली.”