Customer attacked the waitress by smashing a plate into her face, Viral Video: दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. देशासह जगभरात घडणाऱ्या ताज्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहून मन अगदी खिन्न होतं. कधी कधी घटना घडून कितीतरी काळ लोटला असतो, तरी त्यावर हवी तशी कारवाई झालेली दिसत नाही.

जागोजागी, गल्लोगल्ली, देशात-परदेशात महिलांवर होणाऱ्या अन्यायाची सीमा ओलांडली गेली आहे. असाच एक अन्याय लंडनमधील एका वेट्रेसवर झाला आहे. जिथे एका ग्राहकाने वेट्रेसवर जोरदार हल्ला केला, परंतु पोलिसांनी त्याची साधी चौकशीदेखील केली नाही. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या रेस्टॉरंटमध्ये नेमकं असं घडलं तरी काय, ते जाणून घेऊया.

Ladies group dance on Gan Bai Mogra Ganachi Saree marathi song video goes viral on social media
“गण बाय मोगरा गणाची साडी” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल ‘हौस असेल तर वेळ मिळतो’
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Crime NEws
“मी ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते”, लैंगिक संबंधांदरम्यानच महिलेने केली हत्या!
या महिला कधी सुधारणार? फक्त हात लागला म्हणून जोरदार बाचाबाची; इंग्रजीत सुरु झालेलं भांडण हिंदीवर गेलं, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
pune senior citizen latest news
पुणे: मोफत धान्य देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक
woman senior citizen , Fraud , fear of action,
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेदहा लाखांची फसवणूक, ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी
Heartbreaking incident betrayed in love young boy jumps into water in jagdalpur chhattisgarh video
“त्या आईचा तरी विचार करायचा रे” गर्लफ्रेंडने फसवल्याने तरुणाचा टोकाचा निर्णय; VIDEO पाहून धक्का बसेल
Shocking video of Thief snatches phone from young girls hand drags her on street Ludhiana video viral on social media
एका चोरीसाठी अक्षरश: तिच्या जीवाशी खेळला! तरुणीच्या हातातून फोन खेचला, तिला रस्त्यावरून फरफटत नेलं अन्…, VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर

व्हायरल व्हिडीओ (Viral Video of a customer attacked the waitress)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक कुटुंब रेस्टॉरंटमध्ये आपल्या जेवणाची वाट पाहत असताना दिसत आहे. टेबलाच्या एका बाजूला पत्नी आणि लहान मुलं, तर टेबलाच्या दुसऱ्या बाजूला गैरवर्तणूक करणारा ग्राहक बसलेला दिसत आहे. व्हिडीओ सुरू होताच काही वेळाने एक वेट्रेस त्या कुटुंबाची ऑर्डर देण्यासाठी त्यांच्याकडे येताना दिसते. तिने जेवणाची ताटं टेबलावर ठेवताच, तो माणूस त्याच्या शेजारी असलेली एक रिकामी प्लेट उचलतो आणि अचानक त्या प्लेटने तिच्या चेहऱ्यावर जोरात मारतो. हे घडताच वेट्रेस तिथून निघून जाते आणि त्या पाठोपाठ ते कुटुंबदेखील निघून जातं.

ग्राहकाने वेट्रेसवर का केला हल्ला? (Why customer attacked the waitress?)

या विकृत ग्राहकाने असा हल्ला करण्यामागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. तथापि, त्या ग्राहकाच्या पत्नीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. आपल्याबरोबर असभ्य वर्तन झाल्याने ती महिला कर्मचारी या घटनेबाबत वरिष्ठांना सांगायला जाते, तेवढ्यात लगेच तो विकृत ग्राहक त्याच्या कुटुंबासह बिलिंग काउंटरच्या इथे पोहोचतो आणि आपला काढता पाय घेण्याच्या प्रयत्नात असतो.

हेही वाचा… स्टंट करणं पडलं महागात! २४ जणांना अटक केली अन्…, VIDEOतून पाहा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

तक्रार करूनही पोलिस कारवाई नाही

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांनी रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर आणि असभ्य ग्राहकांपासून त्यांच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा व्हिडीओ ‘BLAIM GAME’ या x अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ @zahra_etc अकाउंटवरून रिशेअर करण्यात आला असून, “या घटनेच्या वेळेस पोलिस उपस्थित होते. याची तक्रारदेखील मी त्यांच्याकडे केली, पण कोणतीही विचारपूस, चौकशी न करता किंवा सीसीटीव्ही चेक न करता त्यांनी त्या ग्राहकाला जाऊ दिलं. यामुळे मी त्या पोलिस ऑफिसरची तक्रार दाखल केली आणि यासंबंधित तिथला सुपरवायजर मला म्हणाला की, “ती माणसंच आहेत, ज्यांनी चूक केलीय.” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा… शिक्षकाचे भर वर्गात विद्यार्थिनीबरोबर संतापजनक कृत्य; कानाखाली मारलं अन्… धक्कादायक VIDEO VIRAL

युजर्सचा संताप

या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या व्हिडीओवरून हे कळतं की ही व्यक्ती त्याच्या पत्नीलाही अशीच मारहाण करत असणार.” तर दुसऱ्याने, “जर पोलिस काही करत नसतील तर तुम्ही त्यांच्यावर थेट खटला भरू शकता”, अशी कमेंट केली. अनेकांनी पोलिसांवर निराशा व्यक्त केली आणि वेट्रेसच्या बाजूने आपलं मत मांडलं.

Story img Loader