तुमच्यापैकी अनेकांना चायनीज कॉर्नरवर चायनीज फूड खायला आवडते. काही जण तर रात्री जेवत नाहीत; पण चायनीज फूड खाऊनच पोट भरतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पदपथावर गल्लोगल्ली तुम्हाला चायनीजची अनेक दुकाने पाहायला मिळतात. चवीला चमचमीत असे हे चायनीज फूड खाण्यासाठी चायनीजच्या गाड्यांवर रात्रीच्या वेळी तुफान गर्दी पाहायला मिळते. पण, काही चायनीजच्या गाड्यांवर अजिबात हायजिन आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. त्याची वारंवार काही उदाहरणे समोर आली आहेत; ज्यात चायनीज दुकानदार ग्राहकांच्या जीवाशी खेळ करताना दिसून आले आहेत. त्यात आता पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून तुम्ही आयुष्यात कधीच चायनीज नूडल्स खाणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका चायनीज कॉर्नरच्या फळीवर तयार चायनीज नूडल्स ठेवलेले दिसतायत; ज्यात चक्क जिवंत पांढरे किडे वळवळताना दिसतायत. पण, हेच तयार चायनीज नूडल्स लोकांना खाऊ दिले जात होते. दरम्यान अनेकजण हा किसळवाणा प्रकार तिथे उपस्थितीत लोकही संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

हेही वाचा – VIDEO : “तुझी बहीण आमच्या ताब्यात; तिला सोडव नाही, तर…”; पोलिसांच्या नावे येणाऱ्या ‘अशा’ कॉल्सपासून राहा सावधान!

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर sandeep_jalndhriya1984 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘नूडल्समध्ये आढळले किडे’. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, स्वस्त दुकानातून खाल्लं, तर असं होतं. दुसऱ्या युजरने लिहिले की, चायनीज खाणं आजपासून बंद. तिसऱ्या युजरने लिहिले की, हे चीनचं चायनीज आहे. आणखी एका युजरनं लिहिले की, मी यापुढे कधीही बाहेरचं फास्ट फूड खाणार नाही.