पुण्यात जितकी चर्चा पुणेरी पाट्यांची होते तितकी कशाचीच होत नाही. पुणेरी पाटी हे पुणेकरांच्या पुणेरी शैलीचे प्रतिक आहे. पुणेरी शैली म्हणजे मोजक्या शब्दात उत्तर देणे. पुणेकरांच्या याच शैलीमुळे पुणेरी पाट्यांना प्रसिद्धी मिळाली. पुणेरी पाट्याचा वापर पुणेकर अनेक प्रकारे करतात कधी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी, नियम मोडणाऱ्या नागरिकांवर नियमांचे पालन करण्यास भाग पाडण्यासाठी किंवा फुकट्या ग्राहकांना शा‍ब्दिक टोला मारण्यासाठी या पाट्या सर्रासपणे वापरल्या जातात. सध्या अशाच फुकट्या ग्राहकांसाठी दुकानाबाहेर लावलेली पुणेरी पाटी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणेरी पाटी चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका दुकानाबाहेरील पाटी दिसत आहे. पाटीवर लिहिले आहे की, “ग्राहक हेच आमचे दैवत….हे सत्य! पण उधारी बुडवल्यास दणका बसणारच हेही सत्य”

हेही वाचा – “बाप-लेकाची भन्नाट जोडी!”, मुलाने हटके स्टाईलमध्ये दिलं खास गिफ्ट, वडीलांची प्रतिक्रिया पाहून पोट धरून हसाल, पाहा Viral Video

अनेकदा ग्राहक दुकानदारांकडे उधार खातं सुरु करतात आणि पगार झाल्यावर पैसे देतो असे सांगतात. काही ग्राहक वेळेवर उधारी फेडतात पैसे देतात पण काही ग्राहक वेळेवर उधारी फेडत नाही आणि काही ग्राहक तर उधारी करून पसार होतात. अशा ग्राहकांसाठी पुणेरी दुकानदाराने ही पाटी लावलेली आहे. पुणेकरांची स्पष्टवक्तेपणा दर्शवणारी ही पाटी सध्या तुफान चर्चेत येत आहे.

इंस्टाग्रामवर aapalviralpune’s नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना पुणेकर दुकानदार असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा –“परिस्थिती सगळं शिकवते!” लहान वयात भाकरी करत्येय शेतकऱ्याची लेक, Viral Video एकदा बघाच

सोशल मीडियावर असा अनेक मजेशीर पुणेरी पाट्या नेहमी चर्चेत येत असतात जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात आणि खळखळून हसण्यासाठी भाग पाडतात. पुणेकरी दुकानाबाहेर पाटी व्हायरल होण्याच्या ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अशा पाट्या व्हायरल झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक पाटी चर्चेत त्यावर लिहिले होते, “उधारी एक जादू आहे, आम्ही देणार तुम्ही गायब होणार”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customer is our god this is true but puneri pati outside shops in pune are going viral watch the video snk