ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ऑर्डर केलेला एखादा पदार्थ झटपट तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम ही कंपनी करत असते. केकपासून ते जेवणापर्यंत तुम्ही या ॲपवरून अनेक पदार्थ मागवू शकता. तर हे पदार्थ ऑर्डर करताना तुम्हाला त्या पदार्थात एखादी गोष्ट ॲड (Add ) करायची असेल किंवा केकवर एखादा संदेश लिहायचा असल्यास तिथे बॉक्स दिलेला असतो. या बॉक्समध्ये मर्यादित अक्षरे (लेटर्स) लिहिली जाऊ शकतात. तर या फीचरचा उपयोग करून एका ग्राहकानं झोमॅटोकडे मजेशीर मागणी केली आहे, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

ग्राहकाच्या घरी मांसाहार खाण्याची परवानगी नसते. पण, ग्राहकाची मांसाहार खाण्याची खूप इच्छा असते. त्यामुळे ती झोमॅटोवरून मांसाहारी पदार्थ खायची ऑर्डर देते. तसेच घरच्यांना कळू नये म्हणून नोट्स या फीचरचा उपयोग करून ती बॉक्समध्ये एक संदेश लिहिते. पण, हा मेसेज किंवा संदेशचा चुकीचा अर्थ घेऊन झोमॅटो डिलिव्हरी बॉयने काही तरी उलटंच केलेलं दिसत आहे. ग्राहकाने नेमकं या नोट्समध्ये काय लिहिलं आहे हे तुम्हीसुद्धा या पोस्टमधून बघा.

हेही वाचा…रिक्षाचालक अन् परदेशी पर्यटक, भरदिवसा पर्यटकाला मार्गदर्शन करतानाचा ‘तो’ VIDEO होतोयं व्हायरल; एकदा पाहाच

पोस्ट नक्की बघा :

तुम्ही पोस्टमध्ये पाहिलं असेल की, पदार्थ ऑर्डर करताना ग्राहकाने लिहिले होते की, “ऑर्डरबरोबर घरी बिल पाठवू नका. घरामध्ये चिकन खाण्यास परवानगी नसल्यामुळे बिलामध्ये चिकनचा उल्लेख कृपया कुठेही करू नका”, अशी मजेशीर नोट्स ग्राहकाने लिहिली होती. पण, ही नोट्स पाहूनदेखील हॉटेलने घरी बिल पाठवून ग्राहकाच्या विनंतीच्या अगदी उलटं केलं आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @Sahilarioussss या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. रेस्टॉरंटने बिल पाठवून ग्राहकाच्या विनंतीच्या उलट केले. तुम्ही पोस्टमध्ये बघू शकता की, ग्राहकाच्या हातात बिल आहे व ही मजेशीर नोट त्यामध्ये लिहिली आहे. तसेच ही मजेशीर गोष्ट ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे ठरवले, जे पाहून अनेक नेटकरी पोट धरून हसत आहेत.

Story img Loader