अनेकदा आपण एखाद्या दुकानात गेल्यानंतर खूश होऊन दुकानदाराला टीप देतो आणि त्याच्या कामाचं कौतुक करतो. साधारणपणे काही रुपयांमध्ये ही रक्कम असते. पण कधी कुणी दुकानदाराला हजारो रुपये टिपमध्ये दिल्याचं ऐकलं आहे का? परंतु थायलंडमध्ये एका व्यक्तीने चक्क ३८ हजार रुपये टीप म्हणून दिल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीने एकूण पाचशे डॉलर टीप म्हणून दिले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ थायलंडमधल्या एका सॅंडवीच शॉपमधला आहे. एक युट्यूबर ग्राहक या सॅंडवीच शॉपमध्ये आला होता. या व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, सुरूवातीला युट्यूबर ग्राहक दुकानदाराला पाणी मागतो. दुकानदार लगेच ग्राहकाला पाणी देतो, त्यानंतर ग्राहक म्हणतो की मला सँडविच पाहिजे. पण मी अर्ध्या तासानंतर पैसे देऊ शकेन. दुकानदारही त्या ग्राहकाचं म्हणणं ऐकतो आणि होकार देतो.
आणखी वाचा : वादळ आलं अन्… ट्रक अगदी कागदासारखा उडाला…Viral Video नंतर मिळाली ३५ लाखाची गाडी
अशा स्थितीत ग्राहक त्याला विचारतो की, तू माझ्यावर विश्वास का ठेवलास, तेव्हा दुकानदार म्हणतो की तू चांगला आणि विश्वासू दिसतोस. यानंतर, ग्राहकाने विचारले की इथे काम करताना सर्वात मोठी समस्या काय आहे, तेव्हा दुकानदार सांगतो की इथे भाडे खूप आहे. हे ऐकून ग्राहक त्याला पाचशे डॉलर देतो आणि म्हणतो की, तू माझ्याशी खूप चांगलं वागलास, म्हणून मी हे तुला देत आहे.
आणखी वाचा : जीवाची पर्वा न करता या व्यक्तीने कोब्राला वाचवले, VIRAL VIDEO एकदा पाहाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : हा तर चमत्कारच! पायऱ्यांखाली चक्क उलटी लटकली मांजर, पाहा हा VIRAL VIDEO
ग्राहक आणि दुकानदाराच्या या गोड क्षणाचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांना तो खूप आवडला. आतापर्यंत हा व्हिडीओ तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून चार लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.