सध्या सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज तुफान व्हायरल होत असून यामध्ये तीन तरुण एका हॉटेल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या माणसांना जेवण मिळण्यासाठी झालेला उशीर हे हॉटेलमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचं कारण ठरलं. बुधवारी ९ नोव्हेंबरला रात्री साडे दहा वाजायच्या सुमारास ग्रेटर नोएडाच्या परी चौकातील अन्सल प्लाझामध्ये ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हॉटेलमधील टेबलावर बसलेली तीन माणसे आपले जेवण येण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यातील एक इसम अचानकच उठतो आणि हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला मारायला सुरुवात करतो. हा कर्मचारी शांतपणे कंप्यूटरवर काम करत होता. संतापलेला माणूस या कर्मचाऱ्यांकडे आला आणि त्याला मारहाण करू लागला. यानंतर त्याने त्याला मानेला पकडून खेचत बाहेर नेले आणि जमिनीवर ढकलले. इतकंच नाही तर, यानंतर या तीनही माणसांनी त्या कर्मचाऱ्याला हॉटेलच्या बाहेर आणून त्याला लाथाबुक्क्याने मारू लागले.

ड्रायव्हिंग टेस्ट आहे की चक्रव्यूह? वाहनचालकाचे भन्नाट कौशल्य पाहून तुम्हीही चक्रावून जाल; Viral Video एकदा पाहाच

दरम्यान, एका वृत्तसंस्थेला माहिती देताना ग्रेटर नोएडाचे डीसीपी म्हणाले की संबंधित तीन इसमांची नावे प्रवेश, मनोज आणि क्रेस अशी आहेत. या तिघांनी चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली होती. मात्र जेवण यायला उशीर होत असल्याने एक व्यक्ती भडकला आणि त्याने तेथील कर्मचारी अल्ताफला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडीओची दाखल घेत पोलिसांनी लगेचच या तिघांना ताब्यात घेतले असून संबंधित घटनेचा तपास सुरु आहे.

धक्कादायक! विद्यार्थिनीच्या प्रेमात पडलेल्या PT च्या महिला शिक्षिकेने लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करुन…

शिव अरूर यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून तो आतापर्यंत ३ लाख ३६ हजारांहूनही अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर ६८००हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप झाला असून ते यावर अनेक संतप्त प्रतिक्रियाही देत आहेत.