आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद असा अनुभव आणि क्षण असतो. आई होण्याचा आनंद तर असतोच. पण ज्या क्षणी आई आपल्या बाळाला जन्म देते त्या क्षणापासून आईचं आपल्या बाळाशी नातं जुळतं. आपल्याच हाडामांसाचा असलेला तो जीव म्हणून आईची ९ महिन्यांपासून त्या बाळाशी नाळ जोडलेली असते. ते बाळसुद्धा इवल्याशा डोळ्यांनी आईच्या नजरेला नजर देत असतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर तो ओळखत असलेली जगातली पहिली व्यक्ती आईच असते. आईलाच पाहून हे बाळ मोठं होत असतं. सोशल मीडियावर लहान बाळाचे क्यूट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. असाच एका लहान बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओ पाहून तुम्ही या बाळाच्या निरागसतेच्या प्रेमात पडाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आई आपल्या बाळाला कुशीत घेऊन उभी उभी आहे. आईला पाहून हे बाळ त्याच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन्स देतं ते पाहून सारेच जण या बाळाच्या प्रेमात पडू लागले आहेत. हे बाळ आपल्या आईचीच नक्कल करताना दिसून येत आहे. जेव्हा आई हसते तेव्हा हे बाळ आपल्या चेहऱ्यावर क्यूट स्माईल देतं. आईने मुलाला हसवण्यासाठी जीभ दाखवली तर बाळ सुद्धा आपल्या आईलाच जीभ दाखवतोय. हे निरागस बाळ आपल्या आईच्या या गोंडस एक्सप्रेशन्सची खूप छान नक्कल करतोय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण आपल्या आईसोबत घालवलेल्या क्षणांना आठवत आहेत.
आणखी वाचा : पोलिसच विना हेल्मेट! मग वरिष्ठांनी अशी अद्दल घडवली…, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : बाबो! एका सिंहीणीसाठी दोन सिंह आपआपसात भिडले, पण दोघांच्या भांडणात सिंहीण पसार…पाहा VIRAL VIDEO
अतिशय निरागस भाव ठेवून हे बाळ आपल्या आईची नक्कल करताना खूपच गोंडस दिसून येत आहे. आई आणि बाळामधला हा गोड क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. त्याचा व्हिडीओ babies_town नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. माय-लेकरामधला या गोंडस क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकालाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १.३ मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी आपल्या बालपणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तर काही युजर्सनी बाळाच्या चेहऱ्यावरील गोड एक्सप्रेशन्सचं कौतुक केलंय.