Viral Video : सध्या सगळीकडे पावसाळा सुरू आहे. पावसात भिजू नये म्हणून आपण अनेकदा छत्री, रेनकोटचा वापर करतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पावसाळ्यात छत्री आणि रेनकोटचा वापर करतात पण मुक्या जीवांना अनेकदा पावसाच्या पाण्यात भिजावे लागते. अनेकदा आपण आपल्या पाळीव कुत्र्याला सुद्धा आपण पावसाळ्यात काळजीपोटी बाहेर पडू देत नाही पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तुमच्या कुत्र्याला पावसाळ्यात घराबाहेर घेऊन जाऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तीन कुत्रे भर पावसात घराबाहेर पडलेले दिसत आहे पण व्हिडीओत तुम्हाला दिसेल ती त्यांनी रेनकोट घातला आहे. रेनकोट घालून हे कुत्रे खूप जास्त क्युट दिसत आहे. जर पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या कुत्र्याला घेऊन घराबाहेर जायचे असेल तर तुम्ही सुद्धा असाच रेनकोट तुमच्या कुत्र्यासाठी खरेदी करू शकता. अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर तुम्हाला कुत्र्यांचे एकापेक्षा एक भन्नाट रेनकोट मिळू शकतात.

हेही वाचा : Optical Illusion : फोटोमध्ये लपलेले अंक कोणते? तुम्हाला ‘45283’ हे अंक दिसतात का? पण हे खरं उत्तर नाही; एकदा क्लिक करून पाहा

haustier_liebhaber या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “हे क्युट दिसत नाही का?”
अनेक युजर्सला हे रेनकोट आवडले. एका युजरने लिहिले, ” किती सुंदर रेनकोट आहे!” एका युजरने विचारले आहे, “हा रेनकोट कुठे मिळतो? आणखी एका युजरने लिहिले, “मला पहिल्यांदा माहिती पडले की कुत्र्यांसाठी रेनकोट असतात पण हे खूप छान आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cute dogs wearing raincoat video goes viral in rainy monsoon season ndj
Show comments