पोपट माणासाप्रमाणे बोलतो, भविष्य सांगतो असं तुम्ही ऐकलं असेल. पण माणसासारखा जिज्ञासू सुद्धा असतो, हे जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण होय, हे खरंय. सध्या सोशल मीडियावर असाच एक जिज्ञासू पोपट दिसून आलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. जिज्ञासू पोपटाने जेव्हा हायवेवरील वाहतूकीवर लक्ष ठेवणाऱ्या ट्रॅफिक कॅमेऱ्यात काहीतरी शोधण्याचं ठरवलं तेव्हा खऱ्या अर्थाने ‘बर्ड्स आय व्ह्यू’ या वाक्याला एक नवा अर्थ प्राप्त झालाय. तुम्हाला विश्वास नसेल होत तर हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जिज्ञासू पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत असून यातील पोपटाचे मजेदार हावभाव पाहून तुमच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. यातल्या पोपटाचा अंदाज लोकांना खूपच भावलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक पोपट हायवेवर बसवण्यात आलेल्या एका ट्रॅफिक कॅमेऱ्याच्या वर बसतो. आपण ज्यावर बसलोय ते नक्की काय आहे ? याचा विचार करत हा पोपट त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डोकावण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याला पाहून हा पोपट खोडसाळपणे कॅमेऱ्यासमोर खेळू लागतो. लोकांवर नजर ठेवणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही दिसतंय का हे पाहण्यासाठी पोपट आपले डोळे मोठे करत काही तरी शोधू लागतो. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहून हा पोपट त्याच्या चेहऱ्यावर मजेदार हावभाव देताना दिसून आले.

आणखी वाचा : ‘तुम्ही यूएन मिस केलं!’, फूड डिलिव्हरीसाठी PM आणि CM ना टॅग केलेल्या अभिनेत्याच्या ‘त्या’ ट्विटवर नेटिझन्सच्या कमेंट्सचा महापूर

कधी हा पोपट आपलं डोकं उलटं करून सीसीटीव्हीमध्ये पाहतो. कधी बाजूने येऊन हळूच सीसीटीव्हीमध्ये पाहताना दिसून येतोय. कदाचित सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या काचेत त्याला स्वतःचा चेहरा दिसत असावा आणि यात तो घाबरून पुन्हा मागे जात असावा. पण आपल्याला दिसलेलं नक्की कोण आणि आपल्यासारखंच दिसणारं कोण आहे, हे जाणून घ्यायची त्याची उत्सुकता पाहून लोक या पोपटाच्या जिज्ञासू वृत्तीचं कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : PHOTOS : ‘हे’ देशी जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल! यांच्याकडे प्रत्येक प्रोब्लेमवर आहे सोल्यूशन

या जिज्ञासू पोपटाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर फोटोबॉम्बिंग करणारा हा पोपट खूपच आवडलाय. या क्यूट पोपटाचा व्हिडीओ पाहून लोक सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसून येत आहेत. आत्तापर्यंत ३ हजारांहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. यासोबतच हजारो लोकांनी कमेंट करून पोपटाची मस्ती पाहून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

हा व्हिडीओ ब्राझिलमधला असून ‘kassy’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. शिवाय ते या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स सुद्धा करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘वॉव, इतका अप्रतिम पोपट याआधी कधीच पाहिला नव्हता’. दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘मला वाटतं की या पोपटाला तो कशावर बसला आहे हे समजत नाही.’

Story img Loader