गोंडस स्वभावामुळे श्वान हे सर्वांनाच आवडतात. कधी कधी त्यांचे वर्तन पोट धरून हसवते, तर नाराज झाल्यावर ते आक्रमक देखील होतात. पण ते मनुष्याचे चांगले मित्र बनतात. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये त्यांना बॉल किंवा काही वस्तू आणण्याचा इशारा केल्यास ते या वस्तू तातडीने घेऊन येतात. मनुष्याकडून श्वानांना हा खेळ शिकवला जातो. मात्र, तुम्ही श्वान पिलाला बॉलसोबत कसे खेळायचे याबाबत शिकवत असल्याचे पाहिले आहे का, नसेल पाहिले तर असा एक गोंडस व्हिडिओ इटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून श्वानांप्रति तुमचे प्रेम आणखी वाढेल.

@yoda4ever या ट्विटर युजरने श्वानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक काळे श्वान एका लहानशा पिलाला बॉलसोबत कसे खेळायचे याचे प्रशिक्षण देत आहे. काळ्या रंगाचा अतिशय गोंडस श्वानाचा हा पिलू देखील त्याला प्रतिसाद देत आहे. श्वानाने त्याच्या जबड्यात बॉल आणून ते पिलापुढे टाकले. पिलू देखील बॉल जबड्यात पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो लहान असल्याने त्याला बॉल जबड्यामध्ये धरता येत नाहीये. त्यानंतर हे दोन्ही श्वान एकमेकांबरोबर खेळताना दिसून येत आहे.

(आनंद महिंद्रा यांच्या SCORPIO N च झालं बारसं! मिळालं ‘हे’ दमदार नाव)

नेटकरी म्हणाले..

या व्हिडिओला १ मिलियन व्हूज मिळाले असून ८५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इतक्या लहानशा पिलाला खेळवतानाचा श्वानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या श्वानाचे कौतुक करत आहे. एकाने हे सर्वात सुंदर क्षण असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader