भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची चिमुकली झिवा ही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. साक्षी किंवा धोनीच नाही तर विराटदेखील झिवासोबत घालवलेल्या आनंददायी क्षणाचे व्हिडिओ ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर करतो. यावेळी झिवा आणि धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहमीच धोनी त्याच्या चिमुकलीची काळजी घेतो, पण यावेळी मात्र ‘पापा की परी’ झिवा धोनीची काळजी घेतानाचे क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.

‘या’ देशाचे पंतप्रधान राजाला भेटायला सायकलवरून जातात

फुटबॉल मॅचच्या दरम्यानचा एक व्हिडिओ आहे. यावेळी आपल्या दमलेल्या बाबांसाठी झिवा मैदानात पाणी घेऊन आली. बाबांना पाणी दिल्यानंतर झिवा मैदानातून निघून गेली. काही सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेटमध्ये आपलं करिअर घडवण्याआधी धोनी फुटबॉल संघात गोलकीपर होता. इतकंच नाही तो उत्तम फुटबॉलही खेळायचा. एका फुटबॉल मॅचमध्ये सहभागी होऊन त्याने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी वडिलांचा सामना पाहण्यासाठी झिवादेखील मैदानात आली होती.

मुंबई पोलिसांचा दिलदारपणा, तक्रारदाराला दिला सुखद धक्का

अनेकदा सामन्यामुळे झिवासोबत आपल्याला वेळ घालवता येत नाही, याची खंतही त्याने बोलून दाखवली होती, त्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा कॅप्टन कूल झिवासोबत वेळ घालवतो आणि या अनमोल क्षणाचे व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबतही शेअर करतो.

Story img Loader