तुमच्यापैकी अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करत असतील, अगदी किचनमधील सामानापासून, कपडे, भांडी ते अगदी खाण्याच्या वस्तूंपर्यंत अनेक वस्तू ऑनलाईन ऑर्डर करतात. यात ऑफर्सच्या दिवसात दमदार शॉपिंग केली जाते. पण एखादे ऑनलाईन मागवलेले प्रोडक्ट डिलिव्हर होते तेव्हा तुम्ही बॉक्स किंवा पॅकेटसह पर्सनल माहितीचा चार्ट बिलासह कचऱ्यात फेकून देता का? जर असे करत असाल तर ही सवय आजच थांबवा! कारण सध्याच्या डिलीटल युगात ऑनलाइन फसवणुकीसाठी नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत.

कारण स्कॅमर तुम्ही कचऱ्यात टाकलेल्या बॉक्स/पॅकेटवरील तुमची पर्सनल माहिती चोरून तुमची ऑनलाईन फसवणूक करू शकतात. यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर ऑनलाइन खरेदीदारांना जागरूक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी पोस्ट केलेला व्हिडीओ सर्वांनी एकदा जरुर पाहा. या व्हिडीओच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
indian railway viral video
ट्रेनमधून प्रवास करताना ‘ही’ एक चुक पडू शकते महागात, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO 
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”

ऑनलाईन प्रोडक्ट डिलिव्हरी बॉक्स फेकण्यापूर्वी करा ‘हे’ काम

दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम एक व्यक्ती प्रश्न विचारतोय की, तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी पॅकेजेस तितक्या काळजीपूर्वक हाताळता का? पाहूया. यावेळी डिलिव्हरी बॉय एका व्यक्तीला (रेग्युलर ऑनलाइन शॉपर) पॅकेट डिलिव्हर करतो. यानंतर एक ग्राहक पॅकेज अनबॉक्स करतो आणि त्यातून प्रोडक्ट बाहेर काढतो आणि रिकामा बॉक्स घराबाहेरील डस्टबिनमध्ये टाकतो. यावेळी एक स्कॅमर गुपचूप ग्राहकाची माहिती असलेला बॉक्स उचलतो.

यानंतर तो स्कॅमर बॉक्सवरील फोन नंबरच्या आधारे ग्राहकाला कॉल करत कस्टमर केअर असल्याचे सांगतो. यानंतर त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून OTP मागतो. अशाप्रकारे तो ग्राहकाची ऑनलाईन फसवणूक करतो.

या व्हिडीओसह दिल्ली पोलिसांनी एक मेसेज दिला आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा OTP देण्याची चूक करू नका. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या डिलिव्हरीनंतर बॉक्स किंवा पॅकेज फेकून देण्यापूर्वी त्यावरील पर्सनल माहिती नेहमी मिटवा. सतर्क रहा, सुरक्षित रहा.

सायबर फसवणुकीबद्दल केले जागरूक

दिल्ली पोलिसांनी सायबर फसवणुकीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल (@DelhiPolice) वरून एक व्हिडिओ पोस्ट केला. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही केलेल्या ऑनलाइन ऑर्डरनंतर अशाप्रकारे तुमची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. 1930 वर किंवा http://cybercrime.gov.in वर तुम्ही सायबर क्राइमसंबंधीत तक्रार करा.

यासोबतच दिल्ली पोलिसांनी सायबर सिक्युरिटी आणि सायबर सेफ इंडिया हे हॅशटॅगही वापरले. या ट्विटला आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ३०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी दिल्ली पोलिसांनी जागरुकता निर्माण केल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे आभार मानले आहेत. त्यामुळे तुमचीही अशाप्रकारे कधी अशी ऑनलाईन फसवणूक झाली आहे का? तसेच या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.