जोर्वे येथे राहणाऱ्या आणि अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या शिवराज धनंजय थोरात याने अवघ्या २४ तासांत संगमनेर ते इंदोर प्रवास केला आहे. यात विशेष म्हणजे हे ४५० किलोमीटरचे अंतर त्याने सायकलवर पार करत नवा विश्वविक्र केला असून या विक्रमाची नोंद केली आहे. विश्वविक्रम करणाऱ्या शिवराज धनंजय थोरात याचे शरद पवार यांनीही खास ट्विट करत कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांचं ट्विट

ट्विटवर शरद पवार यांनी लिहले की, ” संगमनेर येथील शिवराज धनंजय थोरात ह्या तरुणाने जागतिक विश्वविक्रम करत संगमनेर ते इंदौर हा ४५५ कि.मी. सायकल प्रवास अवघ्या २४ तासांत पूर्ण केला! ह्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन!” हे लिहित त्यांनी त्याच्यासोबतचा एक फोटो आणि त्याचा सायकल चालवत असतानाचा फोटोही पोस्ट केला आहे.

असा होता प्रवास

शिवराजने २८ जून २०२१ रोजी पहाटे चार वाजता संगमनेरमधून इंदौरकडे प्रयाण केले. त्याने पहाटे चार वाजता प्रवास सुरु केला. त्याने संगमनेर, सिन्नर , नाशिक, धुळे, शिरपूर, शेंदवा, इंदौर असा ४५० किलोमीटरचा अविश्रांत प्रवास सायकलवरून केला. यापूर्वीच्या ४२७ किलोमीटरचा विक्रम मोडित काढत त्याने हा विश्वविक्रम करत वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदीचा मान पटकावला आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

शिवराजच्या विश्वविक्रमामुळे संगमनेरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cycling 455 km in 24 hours sharad pawar congratulate marathi young boy who set a world record ttg