आजवर अनेकांना सायकलवरुन स्टंटबाजी करताना आपण पाहिले. पण ही स्टंटबाजी काही सायकल स्वारांच्या चांगलीच अंगलट येते. अशाचप्रकारे एका सायकल स्वाराला चालत्या सायकलवर स्टंट करणे चांगलेच महागात पडले आहे. यामध्ये सायकलस्वार जॅकेटमध्ये हात घालून सायकलवरुन आरामात जात होता, पण अचानक समोरुन भरधाव वेगात एक कार येते, ज्याला तो जोरदार धडक देतो. या कार आणि सायकलच्या अपघाताचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आनंदात हात सोडून रस्त्यावर सायकल चालवत आहे. तेवढ्यात अचानक एक कार त्याच्या समोरून येते. यावेळी तो जॅकेटमध्ये टाकलेले हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण हात जॅकेटमध्येच अडकून राहतात. अशापरिस्थितीत त्याला काय करावे समजत नाही, सायकल कारच्या जवळ पोहण्यास किंचित अंतर उरलेले असते तरीही त्याचे हात जॅकेटमधून निघत नाहीत. जीव वाचवायचा आहे पण तो कसा वाचवायच्या अशा प्रश्न त्याला पडतो. यामुळे तो खूप घाबरतो, त्याला खूप घाम फुटतो.

यावेळी जॅकेटच्या खिशात अडकलेले हात बाहेर काढून तो सायकलवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करतो. पण घाबरल्यामुळे तो तसे करु शकत नाही, काही केल्या त्याचे हात जॅकेटच्या खिशातच अडकून राहतात. शेवटी तो सायकलबरोबर कारला जाऊन धडकतो आणि नंतर जोरात जमिनीवर कोसळतो. या अपघातात तो गंभीर जखमी होतो.

हा अपघात बघताना जरी भीषण वाटत नसला तरी त्यात सायकल स्वार मात्र गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने त्याला कोणती मोठी दुखापत झाली नाही. @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. जो आता ४१ हजारांहून अधिक लोकांना लाईक्स आहे. अनेक युजर्सनी सायकल स्वाराचीच चुक असल्याचे म्हटले आहे.