‘जो जीता वोही सिकंदर’ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. ‘पहला नशा’ गाण्यासाठी …आणि बाकी बऱ्याच कारणांसाठी गाजलेला हा सिनेमा सायकल रेसिंगवर होता.  आमिर खान, आयेशा जुल्का, पूजा बेदी, दीपक तिजोरीने काम केलेला हा सिनेमा जाम आठवणीत राहिलाय. यात दोन प्रतिस्पर्धी काॅलेजमधले सायक्लिस्ट सायकल रेसमध्ये जिंकण्यासाठी काय काय करतात. व्हिलनची भूमिका करणारा दीपक तिजोरी मग आमिर खान आणि त्याच्या भावाला मारहाण काय करतो, आपल्या मैत्रिणीकरवी त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायला काय पाहतो. पण शेवटी आमिर खान ही रेस जिंकतो आणि सच्चे प्यार की जीत होते.

सायकलिंगशी संबंधित एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यात रेस जिंकायला या रेसरने माणसं वगैरे न पाठवता साध्या तत्वाचा वापर करत रेसमध्ये धमाल आघाडी मिळवली.

वाचा- पठ्ठ्याने समुद्राखाली केलं लग्न!

फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत सायकल बाहेर काढणाऱ्यांव्यतिरिक्त सायकलिंगकडे जे सीरियस व्यायामप्रकार म्हणून पाहतात आणि टूर डी फ्रान्ससारख्या मोठमोठ्या सायकल रेसेस् मध्ये भाग घेतात ते सायकलिंगच्या खेळाचे बारकावे व्यवस्थित समजून घेतात.

वाचा- ‘किती वर्षं तेच ते?’

सायकलिंग करताना स्टॅमिना हा महत्त्वाचा भाग असतोच पण त्याचसोबत काही प्रॅक्टिकल अडचणीही असतात. एक महत्त्वाचा घटक असतो तो रेसदरम्यान हवेचा होणारा विरोध. सायकलिंगमध्ये सगळं काही आपल्याच ताकदीवर अवलंबून असल्याने तासन् तास चालणाऱ्या सायकल रेसमध्ये विरूध्द दिशेने वाहणाऱ्या हवेचा सायकलस्वाराला होणारा विरोध ही एक मोठी बाब असते. त्यातही मिलिसेकंदाने पदक हुकवणाऱ्या इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये हा फॅक्टर खूप मोठा असतो. त्यामुळे प्रोफेशनल सायकलपटूंची सायकल शक्य तेवढी बारीक तयार करण्याचा स्पोर्ट्स् कंपन्याचा कल असतो. तसंच या सायकलस्वारांचं हेल्मेटही हवेला कमीत कमी विरोध करेल असं डिझाईन केलेलं असतं. हवेच्या होणाऱ्या विरोधाच्या तत्वाचा मस्त वापर करतच याच रेसरने रेसमध्ये आघाडी मिळवली. बघा व्हिडिओ

 

सौजन्य: यूट्यूब

मजा आहे! बाकीचे रेसर्स पुढे गेलेले असताना त्यांना मागे टाकायला हा रेसर त्याच्या चालत्या सायकलवर चक्क झोपला. हवेचा विरोध कमी करायचे सगळे उपाय करत सायकलिंग करतानाही हवेचा काही कमीतकमी दाब राहतोच. सायकलस्वार सायकलवर बसलेल्या स्थितीत असताना हा कमीतकमी दाब जाणवतो.

पाहा- धतिंग, धतिंग, धतिंग नाच!

पण या पठ्ठ्याने सायकलवर झोपत त्याला होणारा हवेचा विरोध आणखी कमी केला. आणि रेसमध्ये आघाडी मिळवली. बघा पुन्हा हवं तर! त्याच्या या अफलातून युक्तीमुळे बाकीचे रेसर्स एवढे गोंधळले की त्याला मागे टाकायचं सोडत ते त्याच्याकडे पाहत राहिले आणि तोपर्यंत हा भाई सगळ्यांच्या पुढे जात पुन्हा पहिल्यासारखा सायकलिंग करायला लागला!

Story img Loader