Cyclone Fengal Viral Video : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह पुद्दुचेरी, कर्नाटक आणि दक्षिण आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सध्याया ठिकाणी ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. फेंगल चक्रीवादळ रविवारी पहाटे उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर पोहोचले. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या दोन्ही ठिकाणी गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे चेन्नई विमानतळ रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत बंद करण्यात आले. यावेळी चेन्नईमधले अनेक व्हिडिओ समोर आले, अशातच चक्रीवादळाच्या वेळी लँडिंगसाठी धडपडत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A320 निओ विमानाचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या चक्रीवादळाची ताकद नेमकी किती होती हे या व्हिडीओतून पाहाया मिळतंय. धावपट्टीवर एक विमान चक्क हवेच्या दाबामुळं कलंडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

व्हायरल व्हिडीओमध्ये इंडिगोचे विमान मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या वेळी लँडिंग करताना दिसत आहे.जमिनीवर जवळपास टेकलेल्या विमानाला अगदी शेवटच्या क्षणी त्याचे लँडिंग रद्द करावे लागले. जमिनीपासून अगदी काही इंचावर असलेल्या या विमानाचा अपघात होणार असे वाटत असतानाच हे विमान पुन्हा आकाशात झेपावले. दरम्यान हेलकावे खात लँडिंगचा प्रयत्न करत असलेल्या या विमानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘याला भूतानी पछाडलं…’; लग्नातील तरुणाचा ‘हॉरर’ डान्स पाहून नेटकरी चक्रावले, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

व्हिडिओ शेअर करताना, @aviationbrk या एक्स हँडलने लिहिले, “चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आव्हानात्मक परिस्थिती होती कारण फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळ धडकले आहे आणि पुढील तीन ते चार तासांत तामिळनाडू किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, घरे आणि रुग्णालये पाण्याखाली गेली.” दरम्यान यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हंटलंय, “बापरे खूपच भीतीदायक”, तर आणखी एकानं म्हंटलंय “बिचाऱ्या प्रवाशांनी मरण पाहिलं.”

भारतीय हवामान विभाग

भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मते, चक्रीवादळ फेंगलची हालचाल जमिनीवर आल्यानंतरही अत्यंत मंद आहे आणि वादळ काल रात्रीपासून उत्तर तामिळनाडू-पुडुचेरी किनारपट्टीच्या जवळ आहे. “फेंगल चक्रीवादळ गेल्या ६ तासांमध्ये ७ किमी/ताशी वेगाने नैऋत्येकडे सरकले. पुढील तीन तासांत उत्तर किनारपट्टी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीवर ते हळूहळू पश्चिमेकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे.” भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले.

Story img Loader